Novak Djokovic: गुरुवारी सर्बियन स्टार नोव्हाक जोकोविचने फ्रेंच खेळाडू एन्झो कौयकॉडवर विजय मिळवत ऑस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. २१ वेळा ग्रँडस्लॅम विजेत्या जोकोविचने आपली १०वी ट्रॉफी जिंकण्याचा प्रयत्न करत असताना मेलबर्न पार्क येथे १९१व्या क्रमांकाच्या कौयकॉडचा ६-१, ६-७(५-७) ६-२, ६-० असा पराभव केला.
दुस-या सेटमध्ये त्याच्या उजव्या पायाला पट्टी बांधण्यात आली होती तेव्हा त्याला मेडिकल टाइम-आउट घ्यावा लागला आणि त्याने तो सेट गमावला. मात्र सामना जिंकण्यात त्याला यश आले. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जोकोविचचा हा सलग २३वा विजय होता, तर गेल्या वर्षी तो कोविड-१९ लस न घेतल्याने स्पर्धेत खेळू शकला नव्हता. आता पुढील फेरीत जोकोविचचा सामना ग्रिगोर दिमित्रोव्हशी होणार आहे. सामन्यादरम्यान, जोकोविचला कोर्टवर काही प्रेक्षकांनी त्याच्याकडे सतत केलेल्या विचित्र टिप्पण्यांचा सामना करावा लागला ज्यामुळे त्याच्या खेळावर याचा परिणाम झाला. नऊ वेळच्या चॅम्पियनने चेअर अंपायर फर्गस मर्फी यांच्याकडे जाणीवपूर्वक चिथावण्याचा प्रकार केल्याबद्दल तक्रार केली तेव्हा वातावरण तापले होते.
संतप्त जोकोविच चिथवणाऱ्या चाहत्याकडे बोट दाखवत अंपायरला बोलताना ऐकता येऊ शकते. तो म्हणतो की, “ प्रेक्षकांमधील तो माणूस त्याच्या नशेत आहे, मनाला येईल ते बोलत आहे. अगदी सुरुवातीपासून तो मला भडकवत आहे. तो येथे टेनिस पाहण्यासाठी आलेला नाही, त्याला फक्त माझ्या डोक्यात जायचे आहे, तुम्ही त्याला किमान १० वेळा ऐकले आहे, मी त्याला ५० वेळा ऐकले आहे. तुम्ही याबद्दल काय करणार आहात? त्याला स्टेडियममधून बाहेर काढा.” त्या प्रेक्षकाच्या गैरवर्तनासाठी जोकोविचने अंपायरकडे तक्रार केली.
खेळाच्या शेवटी, चिथवणाऱ्या चाहत्यांना स्टेडियमच्या बाहेर काढण्यात आले
माजी क्रमांक १चा ब्रिटीश खेळाडू लॉरा रॉबसन यांनी जोकोविचच्या कृतीचे समर्थन केले आणि ते म्हणाले की प्रेक्षकांच्या या वर्तणुकीने जोकोविचचे हताश होणे हे समजण्यासारखे आहे. रॉबसनने सीएनएन स्पोर्टला सांगताना म्हणाले की, “मला वाटते की प्रत्येकजण त्या पातळीच्या व्यत्ययामुळे थोडा निराश होईल. आणि रॉड लेव्हरसारख्या स्टेडियममध्ये, जेव्हा तुम्ही कोर्टवर असता तेव्हा तुम्ही सर्वकाही ऐकू शकता.”
रॉबसन पुढे म्हणतो की, “बेसलाइन आणि पहिल्या दोन पंक्तीमधील लोकांमध्ये फारसे अंतर नाही. आणि म्हणूनच तो पॉइंट नंतर पॉइंट हाताळत होता आणि अखेरीस, त्यांना बाहेर काढण्याआधी सामना संपेपर्यंत जवळजवळ वेळ लागला, परंतु तुम्हाला येणारी निराशा समजू शकते.” शनिवारी स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत जोकोविचचा सामना २७ व्या मानांकित बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हशी होणार आहे.