जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या अ‍ॅश्ले बार्टीने इतिहास रचला आहे. तिने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले. तिने आज शनिवारी महिला एकेरीच्या विजेतेपदाच्या लढतीत अमेरिकेच्या डॅनिएल कॉलिन्सचा ६-३, ७-६ असा पराभव केला. हा सामना २७ मिनिटांत संपवला. विशेष म्हणजे बार्टीने संपूर्ण स्पर्धेत एकही सेट गमावला नाही.

बार्टीने २८ वर्षीय कॉलिन्सवर सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले आणि पहिला सेट ६-३ असा सहज जिंकला. यानंतर कॉलिन्सने दुसऱ्या सेटमध्ये प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण बार्टीने हा सेट ७-६ असा जिंकून आपले तिसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले. बार्टीने यापूर्वी २०१९ मध्ये फ्रेंच ओपन आणि २०२१ मध्ये विम्बल्डन जिंकले होते. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये बार्टीचा विजय-पराजय रेकॉर्ड आता २४-८असा आहे. २०२२मध्ये तिने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला जेथे तिला अमेरिकन खेळाडू सोफिया केनिनने पराभूत केले.

novak djokovic breaks roger federer record
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : जोकोविचचे ऐतिहासिक यश ; फेडररला मागे टाकत सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामन्यांत सहभाग
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
ojas kulkarni of kolhapur participated in first world cup kho kh
ऑस्ट्रेलियन खो-खोची ‘ओजस्वी’ कहाणी! खेळ माहीत नसलेल्या देशाचा भारतीय ‘द्रोणाचार्य’
Adam Gilchrist says Sir Don Bradman would have troubled ahead Jasprit Bumrah in batting
Jasprit Bumrah : ‘….बुमराह असता तर ब्रॅडमनची सरासरी ९९ नसती’, आस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचं मोठं विधान
New Zealand announces 15 member squad led by Mitchell Santner for Champions Trophy 2025
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! केन विल्यमसन नव्हे तर ‘हा’ खेळाडू सांभाळणार धुरा
Alcaraz, Sinner main attraction in Australian Open tennis tournament from today
अल्कराझ, सिन्नेर मुख्य आकर्षण; ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा आजपासून
NZ vs SL Sri Lanka beat New Zealand by 140 runs Mark Chapman 82 runs in 3rd ODI match at Eden Park
NZ vs SL : तिसऱ्या वनडेत श्रीलंकेने उडवला न्यूझीलंडचा धुव्वा, मार्क चॅपमनची खेळी ठरली व्यर्थ
South Africas sports minister calls for boycott of Afghanistan match in Champions Trophy 2025
Champions Trophy 2025 : ‘अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाका…’, दक्षिण आफ्रिकेच्या क्रीडामंत्र्यांची मागणी

हेही वाचा – IPL 2022 : मेगा ऑक्शनमध्ये नशीब आजमवणार भूतानचा खेळाडू; धोनीनं दिला ‘असा’ कानमंत्र!

४४ वर्षांनंतर हे विजेतेपद पटकावणारी बार्टी पहिली ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरली आहे. यापूर्वी १९७८ मध्ये ख्रिस ओ’नीलने ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकावले होते.

टेनिस..क्रिकेट…पुन्हा टेनिस..!

अ‍ॅश्ले बार्टी ही क्रिकेटपटूही राहिली आहे. ब्रिस्बेन हीटसाठी तिने महिला बिग बॅश लीगमध्येही आपली चमक दाखवली होती. मात्र आता तिने टेनिसमध्ये आपला ठसा उमटवला. वयाच्या १५व्या वर्षापासून ती स्टार टेनिसपटू आहे आणि २०१३मध्ये विम्बल्डनमध्ये पदार्पण केले. २०१४मध्ये बार्टीने टेनिसमधून ब्रेक घेऊन क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ती फक्त १९ वर्षांची होती. तिने महिला बिग बॅश लीगमध्ये ब्रिस्बेन हीटसाठी ९ सामन्यांत ११.३३च्या सरासरीने ६८ धावा केल्या. यापूर्वी, ती वेस्टर्न सबडर्ब जिल्हा क्रिकेट क्लबकडून खेळली होती. बार्टीने २०१६मध्ये टेनिस क्षेत्रात परतण्याचा निर्णय घेतला.

Story img Loader