ऑस्ट्रेलियन ओपनच किताबाचा तीन वेळा मानकरी ठरलेला नोवाक जोकोव्हिचने यंदाचे ऑस्ट्रेलियन ओपन सुरू होण्याआधी चषका सोबत आपले फोटोशूट केले. त्याच्यासोबत ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला गटातील गतविजेती व्हिक्टोरिया अझारेन्काचेही चषकासोबत फोटशूट झाले.
फोटोशूटच्या निमित्ताने चषकावर माझ्या बोटांचे उमटलेले ठसेच सांगतील की यावेळीही अजिंक्यपदाची वेळ माझीच आहे. असे म्हणत जोकोव्हिचने प्रतिष्ठेच्या आव्हानाला सज्ज असल्याचे म्हटले.
तसेच तीनवेळा विजेतेपद पटाकावल्यामुळे गाफील राहण्याचीही जागा ठेवू नये कारण, राफेल नदाल, अँन्डी मरे, ज्यूएन पोट्रो आणि रॉजर फेडरर सारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यांचे आव्हान पेलणे तितकेसे सोपे नसल्याचेही भान राखायला हवे असेही जोकोव्हिच म्हणाला. जागतिक क्रमवारीत ९०व्या स्थानी असलेल्या लुकास लॅको विरुद्ध जोकोव्हिचची पहिली लढाई आहे. सुरूवातीचे अढथळे तितकेसे घातक नसले तरी उपांत्यपूर्व, उपांत्यफेरीत जोकोव्हिचची खरी कसोटी असेल.
महिला गटाचीही गोष्ट काही वेगळी नाही. गतविजेती व्हिक्टोरिया अझारेन्कानेही विजेतेपद कायम राखण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तिच्यासमोर सेरेना विल्यम्स, मारिया शारापोवा यांचे कडवे आव्हान असेल. गतविजेतेपद ही जमेची बाजू व्हिक्टोरियाकडे आहे. परंतु, सेरेना, शारापोवा याही विजेतेपदाच्या प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे पुरूष आणि महिला दोन्ही बाजूंनी कडवी टक्कर होणार असून. टेनिस रसिकांना ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये रोमांचकारी सामन्यांचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

Story img Loader