फेडररचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत धडक
ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धा
सव्र्हिस करायच्या हाताला झालेली खोल जखम आणि समोर रॉजर फेडररसारख्या मातब्बर खेळाडूचे आव्हान. परंतु जिंकण्याची ईर्षां नसानसांत भिनलेल्या राफेल नदालने सर्व आव्हाने पेलत नेहमीच्या त्वेषाने तडफदार खेळ करताना ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. रॉजर फेडररवर ७-६ (७-४), ६-३, ६-३ सरळ सेट्समध्ये मात करत त्याने ‘नदाल’शाही प्रस्थापित केली. अंतिम फेरीत स्वित्र्झलडच्या स्टॅनिसलॉस वॉवरिन्काशी त्याची लढत होणार आहे. रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच, अँडी मरे हे जेतेपदासाठीचे हुकुमी एक्के गारद झाल्याने नदालच जेतेपदाचा मुकुट पटकावण्यासाठीचा प्रबळ दावेदार आहे.
यंदाच्या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाल्यापासून, नदाल-फेडरर मुकाबल्याची टेनिसरसिकांमध्ये चर्चा होती. शांत, संयमी, शैलीदार असा फेडररचा खेळ तर चिवट, झुंजार आणि अफाट ऊर्जेसह खेळणारा नदाल यांच्यातील हा मुकाबला झाला आणि फेडररविरुद्धची उत्तम कामगिरीची आकडेवारी सुधारत नदालने दमदार वर्चस्वासह विजय साकारला. २००७नंतर नदालला रोखण्यात फेडररला अपयश आले होते. या पराभवामुळे फेडररच्या खेळातील ही मर्यादा अधोरेखित झाली आहे. २०१३ हे वर्ष जेतेपदांच्या दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या फेडररला या स्पर्धेद्वारे जेतेपदावर मोहोर उमटवण्यासाठी सर्वोत्तम संधी होती. मात्र नदालसमोर तो निष्प्रभ ठरला. नदाल-फेडरर लढतींमध्ये नदाल आता २३-१० असा आघाडीवर आहे.
डाव्या हाताला झालेल्या दुखापतीमुळे नाऊमेद न होता नदालने आक्रमक खेळ करताना चार वेळा फेडररची सव्र्हिस भेदली आणि केवळ एकदा स्वत:ची सव्र्हिस गमावली. फेडररच्या ५०च्या तुलनेत नदालच्या हातून केवळ २५ चुका झाल्या.
ब्रेक पॉइंट्सच्या आधारे फेडररने पहिला सेट टायब्रेकरमध्ये नेला मात्र व्हॉली करताना झालेल्या चुकांचा फटका फेडररला बसला आणि नदालने पहिला सेटजिंकला. दुसऱ्या सेटमध्ये जमिनीलगतच्या फटक्यांचे जबरदस्त प्रभुत्व राखताना नदालने फेडररवर दडपण आणले. फेडररच्या फटक्यांना फोरहँडच्या ताकदवान फटक्यांनी प्रत्युत्तर देत नदालने दुसरा सेटही नावावर केला. तिसऱ्या सेटमध्ये फेडररची सव्र्हिस भेदत नदालने ४-३ अशी आघाडी घेतली. नवव्या गेममध्ये फेडररची सव्र्हिस रोखत नदालने दुसरा मॅच पॉइंटसह तिसरा सेटसह सामन्यावर कब्जा केला.
रविवारी होणारा अंतिम मुकाबला नदालची १९वी ग्रँडस्लॅम अंतिम लढत असणार आहे. जेतेपदावर कब्जा करत पीट सॅम्प्रसचा १४ जेतेपदांच्या विक्रमाची बरोबरी करण्याची नदालला संधी आहे.
नदाल एक्स्प्रेस!
सव्र्हिस करायच्या हाताला झालेली खोल जखम आणि समोर रॉजर फेडररसारख्या मातब्बर खेळाडूचे आव्हान. परंतु जिंकण्याची ईर्षां नसानसांत भिनलेल्या राफेल नदालने सर्व आव्हाने पेलत नेहमीच्या त्वेषाने
First published on: 25-01-2014 at 01:18 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australian open rafael nadal outclasses outplays roger federer in straight sets