ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये उपांत्यपूर्व फेरीत अँडी मरे या जागतिक क्रमावारीत चौथ्या मानांकित खेळाडूवर मात करत रॉजर फेडररने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
रॉजर फेडररने अँडी मरेचा ६-३, ६-४, ७-६(६), ६-३ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. या विजयानंतर रॉजर फेडररसाठी स्पर्धेच्या उपांत्यफेरीचे दार उघडले असून क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या राफेल नदालचे आव्हान फेडरर समोर असणार आहे.
यावेळीच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये धक्कादायक निकाल लागल्याची पार्श्वभूमी असल्यामुळे उपांत्य फेरीतील नदाल-फेडरर टक्कर नक्कीच अतितटीची ठरेल. त्यामुळे टेनिस चाहत्यांना उपांत्यफेरीचे वेध लागून राहीले आहेत.
अँडी मरे विरुद्धच्या सामन्यात फेडररला कडवी झुंज द्यावी लागली. तिसऱया सेटमध्ये सामन्याने रंगतदार वळण घेतले होते. अखेर फेडररने आक्रमक खेळी करत सामना आपल्या बाजूचे पारडे जड असल्याचे सिद्ध केले आणि विजय प्राप्त केला. रॉजर फेडररच्या नावे आजतागायत एकूण १७ ग्रँडस्लॅम विजेतीपदे आहेत. तसेच ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यफेरीत प्रवेश मिळविण्याची ही फेडररची ११वी वेळ आहे. अनुभवाच्या दृष्टीने रॉजर फेडररचे पारडे जड आहे. तर दुसऱया बाजूला राफेल नदाल सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. जागतिक क्रमवारीत नदाल अव्वल स्थान कायम राखून आहे.  

Story img Loader