मेलबर्नमधील रखरखत्या उन्हाच्या झळांमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत रॉजर फेडररने ब्लाज क्लाविकवर मात करत तिसऱया फेरीत प्रवेश केला आहे.

एकूण १०७ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात फेडररने क्लाविकचा ६-२, ६-१, ७-६ असा पराभव केला. फेडररने पहिल्या सेट पासूनच दमदार कामगिरी केली. पहिल्या सेटमध्ये मिळवेलेली आघाडी कायम राखत फेडररने तिन्ही सेटमध्ये सहज विजय मिळविला. विजय प्राप्त केल्यानंतर रॉजर फेडरर म्हणाला की, इतक्या प्रखर उन्हात खेळणे खरेचं आव्हानात्मक आहे आणि सामन्याच्या निकालावर मी खूश आहे. मी सुरूवाती पासूनच आक्रमक खेळी केली आणि त्याचा फायदाही झाला. यापुढच्या सामन्यातही दमदार कामगिरी करेन असा विश्वासही फेडररने यावेळी व्यक्त केला.

Story img Loader