या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या संयोजकांची घोषणा

जानेवारीत होणाऱ्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पारितोषिक रकमेत १३.६ टक्क्यांची भरघोस वाढ मंगळवारी करण्यात आली आहे. याआधी ४ कोटी, ९१ लाख डॉलर एकूण पारितोषिक रक्कम होती, ती आता ७ कोटी, १० लाख डॉलर करण्यात आली आहे.

वर्षांतील या पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष आणि महिला विभागातील विजेत्या खेळाडूंना प्रत्येकी ४१ लाख, २० हजार डॉलरचे रोख इनाम मिळेल. यात मागील वर्षांपेक्षा थोडीच वाढ झाली आहे. मात्र सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये बाद होणाऱ्या खेळाडूंच्या पारितोषिक रकमेत मात्र चांगली वाढ करण्यात आली आहे. पहिल्या फेरीत आव्हान संपुष्टात येणाऱ्या खेळाडूला २० टक्के अधिक म्हणजेच ९० हजार डॉलर बक्षीस मिळेल, तर दुसऱ्या फेरीत बाद होणाऱ्या खेळाडूच्या रकमेत २१.९ टक्के वाढ झाली असून, त्याला १ लाख, २८ हजार डॉलर बक्षीस मिळेल.

‘‘प्रत्येक वर्षांप्रमाणे या वर्षीसुद्धा आम्ही स्पर्धेच्या पारितोषिक रकमेत वाढ करण्याबाबत चर्चा केली. खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, या हेतूने प्रत्येक फेऱ्यांच्या पारितोषिकांमध्ये आम्ही मोठी वाढ केली आहे,’’ अशी माहिती स्पर्धा संचालक क्रेग टायले यांनी दिली.

सेरेना-वोझ्नियाकी प्रथमच एकत्र

ऑकलंड : एकमेकींच्या घनिष्ठ मैत्रिणी असलेल्या सेरेना विल्यम्स आणि कॅरोलिन वोझ्नियाकी या टेनिसपटू प्रथमच एकत्र खेळणार आहेत. ६ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या डब्ल्यूटीए ऑकलंड क्लासिक टेनिस स्पर्धेत या दोघी महिला दुहेरीत सहभागी होणार आहेत. डेन्मार्कची २९ वर्षीय वोझ्नियाकी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेनंतर निवृत्त होणार आहे. मात्र ही स्पर्धा संस्मरणीय ठरावी, यासाठी तीन वर्षांनंतर प्रथमच वोझ्नियाकी दुहेरीतही सहभागी होणार असून अमेरिकेच्या २३ ग्रँड स्लॅम विजेत्या सेरेनाने तिच्यासह खेळण्यास संमती दर्शवली आहे.

अंतिम विजेता वगळल्यास प्रत्येक फेरीतील विजेत्याला दुहेरी आकडय़ातील टक्क्यांमध्ये वाढ  झाली आहे. अन्य ग्रँडस्लॅम स्पर्धेची तुलना केल्यास ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पारितोषिक रकमेत गेलया पाच वर्षांत ६१.४ टक्क्यांनी  वाढ झाली आहे. – क्रेग टायले, ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेचे स्पर्धा संचालक