आयपीएल २०२३ साठी सर्व आययपीएल फ्रँचायझी त्यांच्या खेळाडूंना रिटेन आणि रिलीज करत आहेत. आयपीएलच्या यंदाच्या हंगामाचा लिलाव यावर्षी २३ डिसेंबर रोजी कोची येथे होणार आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनने मिनी लिलावासाठी आपले नाव दिले आहे. ग्रीनसारख्या पॉवर हिटरवर अनेक संघांची नजर असेल. मिनी लिलावात ग्रीनवर कोटींची बोली लागणार असल्याचे मानले जात आहे.

२०२२ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत संघ व्यवस्थापनाने ग्रीनची निवड केली नव्हती. मात्र, यष्टिरक्षक फलंदाज जोश इंग्लिशच्या दुखापतीनंतर निवड समितीने त्याला संधी दिली. आक्रमक फलंदाजी व्यतिरिक्त, ग्रीन उत्कृष्ट गोलंदाजी देखील करतो. संघ त्याला फलंदाजी आणि चार षटके गोलंदाजी करु शकतो. ग्रीनच्या नावापूर्वी ऑस्ट्रेलियन एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार पॅट कमिन्सने पुढील आयपीएलमधून आपले नाव मागे घेतले.

दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाच्या उर्वरित खेळाडूंबद्दल बोलायचे तर, टी-२० कर्णधार अॅरॉन फिंच आयपीएल २०२३ च्या हंगामातून आपले नाव मागे घेण्याची शक्यता आहे. तसेच, ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडला गेल्या वर्षीच्या चॅम्पियन गुजरात टायटन्सने कायम ठेवले आहे.

हेही वाचा – मोहम्मद रिझवानने मैदानावर नमाज पठण केल्याने संतापला पाकचा माजी क्रिकेटपटू; म्हणाला,…..!

सर्व १० आयपीएल फ्रँचायझींना त्यांचे खेळाडू सोडण्यासाठी आणि कायम ठेवण्यासाठी 15 नोव्हेंबरपर्यंत वेळ देण्यात आला आहे. शेवटच्या हंगामाच्या लिलावात शिल्लक राहिलेले पैसे आणि सोडण्यात आलेल्या खेळाडूंच्या पैशांव्यतिरिक्त फ्रँचायझीला आणखी ५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. आता लिलावाच्या रकमेबद्दल बोलायचे झाले तर एका फ्रँचायझीला एकूण ९५ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

Story img Loader