भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. या दौऱ्यावर अॅलिसा हिली संघाची कर्णधार असेल. मेग लॅनिंगने ऑगस्टमध्ये क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आणि अद्याप पुनरागमन केले नाही. या कारणास्तव अॅलिसा हिली संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. ताहलिया मॅकग्राकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियन महिला संघात अॅशले गार्डनर, जेस जोनासेन, निकोला केरी, डार्सी ब्राउन आणि एलिस पेरी यांचाही समावेश आहे. त्याच वेळी, दोन युवा खेळाडूंना प्रथमच संघात स्थान मिळाले आहे, ज्यांची नावे किम गर्थ आणि फोबी लिचफील्ड आहेत.
ऑस्ट्रेलियन संघ डिसेंबरमध्ये भारताचा दौरा करणार असून पाच टी-२० सामने खेळणार आहे. ही मालिका ९ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील पाच सामने ११ दिवस चालतील आणि सर्व सामने मुंबईत खेळवले जातील. पहिले दोन सामने डीवाय पाटील स्टेडियमवर होणार आहेत. या वर्षी मे महिन्यात या दौऱ्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र तारखा आणि ठिकाणे अद्याप ठरलेली नव्हती. या सामन्यांच्या वेळा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. बिग बॅश लीगच्या चालू हंगामाच्या समाप्तीनंतर ऑस्ट्रेलियन खेळाडू भारताला भेट देतील.
भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ पुढीलप्रमाणे –
९ डिसेंबर: पहिला टी-२०, डीवाय पाटील स्टेडियम
११ डिसेंबर: दुसरी टी-20, डीवाय पाटील स्टेडियम
१४ डिसेंबर: तिसरा टी-२०, ब्रेबॉर्न स्टेडियम
१७ डिसेंबर: चौथा टी-२०, ब्रेबॉर्न स्टेडियम
२० डिसेंबर: पाचवा टी-२०, ब्रेबॉर्न स्टेडियम