उत्तेजक औषधे सेवनाची कबुली दिल्यानंतर लोकांच्या गळ्यातील ताईत असलेला सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँग हा आता टवाळकीचा विषय झाला आहे. येथील एका ग्रंथालयाने त्याच्यावरील पुस्तकांची रवानगी कादंबरी विभागात केली आहे. लान्स आर्मस्ट्राँग-जगातील श्रेष्ठ सायकलपटू आदी पुस्तकांसह त्याच्यावरील सर्व पुस्तके आता कादंबरी विभागात लावली जाणार आहेत, अशी सूचना येथील मॅनले ग्रंथालयाने लिहिली आहे. या ग्रंथालयातील वरिष्ठ पदाधिकारी वेंडी फोर्ड यांनी सांगितले, एका आठवडय़ापूर्वी आर्मस्ट्राँगवरील पुस्तकांना भरपूर मागणी होती. आता मात्र त्याच्या लोकप्रियतेत घट झाली आहे. त्याच्या पुस्तकांकरिता आता आगाऊ नोंदणी केली जात नाही.
ऑस्ट्रेलियातही आर्मस्ट्राँग हा टवाळकीचा विषय
उत्तेजक औषधे सेवनाची कबुली दिल्यानंतर लोकांच्या गळ्यातील ताईत असलेला सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँग हा आता टवाळकीचा विषय झाला आहे. येथील एका ग्रंथालयाने त्याच्यावरील पुस्तकांची रवानगी कादंबरी विभागात केली आहे
First published on: 22-01-2013 at 12:01 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Austrelias armstrong subject is warst