AUSW vs SAW Final Match Updates: महिला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. सलग तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकण्याच्या इराद्याने ऑस्ट्रेलियन संघ मैदानात उतरणार आहे. ऑस्ट्रेलियाने महिला टी-२० विश्वचषक पाच वेळा जिंकला असून सहाव्यांदा विजेतेपद पटकावण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. त्याचवेळी, दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथमच अंतिम सामना खेळत आहे. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्या घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकून आनंद साजरा करण्याची संधी देण्याचा प्रयत्न करेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिला क्रिकेटमध्ये नेहमीच ऑस्ट्रेलियन संघाचा दबदबा राहिला आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेचा संघ इतिहास रचण्याच्या इराद्याने या स्पर्धेत खेळला आहे. दोन्ही संघ उत्कृष्ट लयीत आहेत. अशा स्थितीत अंतिम सामन्यात निकराची लढत होणार हे निश्चित आहे. जाणून घेऊया मॅचच्या प्रक्षेपण आणि ऑनलाइन टेलिकास्टशी संबंधित सर्व माहिती…

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना कधी होणार आहे?

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना २६ फेब्रुवारी (रविवार) रोजी होणार आहे.

महिला टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना कोठे खेळला जाणार?

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर खेळवला जाणार आहे.

महिला टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना कधी सुरू होणार?

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला टी-२० विश्वचषकाचा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ६:३० वाजता खेळवला जाईल. नाणेफेक संध्याकाळी ६ वाजता होईल.

सामना कोणत्या टीव्ही चॅनलवर प्रसारित होईल?

स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे महिला टी-२० विश्वचषकाचे सामने प्रसारित करण्याचे अधिकार आहेत. हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त देशातील इतर भाषांमध्ये कॉमेंट्रीसह पाहू शकता.

मोबाईल किंवा लॅपटॉपवर लाइव्ह मॅच कशी बघायची?

भारतातील हॉटस्टार अॅपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल.

हेही वाचा – IND vs AUS 3rd Test: केएल राहुलच्या संघातील स्थानाबद्दल रवी शास्त्रीचं मोठं वक्तव्य; म्हणाले, ‘जर उपकर्णधार…’

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेन्हन –

ऑस्ट्रेलिया: अ‍ॅलिसा हिली, बेथ मुनी, मेग लॅनिंग (कर्णधार), ऍशले गार्डनर, ग्रेस हॅरिस, एलिस पेरी, ताहिला मॅकग्रा, जॉर्जिया वेरेहॅम, जेस जोनासेन, मेगन शुट, डी’आर्सी ब्राउन.

दक्षिण आफ्रिका: लॉरा वोल्डवोर्ट, ताजमिन ब्रिट्स, मारिजाने कॅप, सुने लुस (कर्णधार), क्लो ट्रायॉन, अनेके बॉश, नादिन डी क्लर्क, सिनालो जाफ्ता, शबनीम इस्माईल, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको म्लाबा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ausw vs saw t20 final match know when and where to watch vbm