अवध वॉरियर्स संघाने आगामी आयबीएल स्पर्धेसाठी अकरावा खेळाडू म्हणून विनयकुमार सिंग याला करारबद्ध केले आहे. या स्पर्धेस पुढील आठवडय़ात प्रारंभ होत आहे,
विनयकुमार हा १९ वर्षांखालील भारतीय संघात खेळत असून त्याने आशियाई युवा स्पर्धेतील मुले दुहेरी व मिश्रदुहेरी या प्रकारात प्रतिनिधित्व केले होते. त्याने गतवर्षी कुमारांच्या अखिल भारतीय मानांकन स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते.
आयबीएल स्पर्धा अठरा दिवस चालणार आहे. या स्पर्धेत सहा फ्रँचायजींचा समावेश आहे. अव्वल साखळी पद्धतीने होणाऱ्या या स्पर्धेतील साखळी सामन्यानंतर पहिले चार क्रमांक मिळविणारे संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. ३१ ऑगस्ट रोजी मुंबई येथे अंतिम सामना होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Awadhe warriors names vinay as u 19 player
Show comments