टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलने त्याची गर्लंफ्रेंड मेहाशी लग्न केले आहे. अक्षर पटेलने लग्नामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून ब्रेक घेतला होता. त्याचबरोबर आता तो तीन सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेचाही भाग नाही. या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये अक्षरच्या खास डान्सचा व्हिडिओ खूप शेअर केला जात आहे.
अक्षर पटेलने मेहासोबत ‘तेरे दिल से ना खेलूंगा’ गाण्यावर डान्स केला. किंगचे हे गाणे सध्या खूप लोकप्रिय झाले आहे. तेरे दिल से ना खेलूंगा, या गाण्यात या ओळी येताच अक्षरने त्याच्या नृत्यात फलंदाजी आणि झेल पकडण्याच्या स्टेप्सचा समावेश केला. अक्षरने आधी षटकार मारण्याची आणि नंतर झेल घेण्याची स्टेप्स करुन दाखवली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
अक्षर पटेल आणि मेहा मेहा वडोदर अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर जानेवारी २०२२ मध्ये दोघांनी साखरपुडा केला. अक्षरची पत्नी मेहता ही एक प्रोफेशनल डायटीशियन आहे. मेहा पटेलने आपल्या इन्स्टाग्रामवर अनेक डाएट प्लॅन शेअर केले आहेत. याशिवाय ती डाएटशी संबंधित माहिती देखील शेअर करत असते.
अक्षर पटेलने गेल्या काही महिन्यांत टीम इंडियाला रवींद्र जडेजाची उणीव भासू दिलेली नाही. अक्षरने बॅट आणि बॉलने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.