सध्या सर्व जग फुटबॉलमय झाले आहे. जो तो आपापल्यापरीने स्वत:ला या जागतिक क्रीडा सोहळ्याशी जोडत आहे. फेसबुक आणि टि्वटरसारख्या सोशल मीडिया वेबसाइट ‘फिफा वर्ल्डकप २०१४’च्या अपडेट्सने भरून जात आहे. रेल्वे, बस, कॉलेजचा कट्टा आणि ऑफीसातून फूटबॉलच्या गप्पा रंगत आहेत. जगभरातून फूटबॉलचे लाखो चाहते या खेळाचा रोमांच अनुभवण्यासाठी फूटबॉलची मांदियाळी भरलेल्या ब्राझिलमध्ये जमले आहेत. …ती सुद्धा आपल्या देशाच्या खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी बेल्जिअमवरून आली होती. एक्सल डेस्पिजेलेरे असं तिच नाव आहे. जरी बेल्जिअमचा संघ ‘फुटबॉल वर्ल्डकप २०१४’मधून बाहेर पडला असला तरी या बेल्जिअम सुंदरीचे नशिब फळफळले आहे. त्याच झाल असं… एका फुटबॉल सामन्यादरम्यान तिची छबी टीव्हीवर दिसली. तेव्हापासून या सुंदरीची छायाचित्र इंटरनेटवर सर्वत्र फिरत आहेत. फेसबुक आणि टि्वटरवर तिचे अनेक चाहते निर्माण झाले आहेत. सर्वत्र तिचीच चर्चा आहे. स्त्रियांसाठी सौदर्यप्रसाधने बनविणारी प्रसिद्ध कंपनी ‘लॉरिअल’चे लक्ष या सुंदर तरुणीने वेधून घेतले. झाल मग काय… या बाईचे दिवसचं फिरले. लॉरिअलच्या प्रतिनिधींकडून तिला संपर्क साधण्यात आला आणि आज ती लॉरिअली मॉडेल म्हणून स्वत:ला मिरवत आहे. यावरून योग्य वेळी योग्य ठिकाणी असणे किती महत्वाचं असतं असच म्हणावस वाटत…
पाहा व्हिडिओ-

photo : Axelle Despiegelaere The Belgium Soccer Chick Facebook page
video : L’Oréal Professionnel BELGILUX

Story img Loader