Ayesha Naseem Retirement: पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची आशादायी युवा खेळाडू आयशा नसीम हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आयशा फक्त १८ वर्षांची आहे. इस्लामनुसार जीवन जगण्यासाठी तिने हा निर्णय घेतला आहे. गुरुवारी तिने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आपल्या निर्णयाची माहिती दिली. आयशाने २०२० मध्ये पाकिस्तानसाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तिने पीसीबीला सांगितले की, “मी क्रिकेट सोडत आहे आणि मला माझे जीवन इस्लामनुसार जगायचे आहे.”

आयशा नसीमचे वय अवघे जरी १८ वर्षे असले तरी ती क्रिकेटच्या मैदानावर दिसणार नाही. वास्तविक, आयशा नसीमने इस्लाममुळे क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. आयशा नसीमने सांगितले की, “तिला तिचे जीवन इस्लामनुसार जगायचे आहे, त्यामुळे तिने क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे.” आयशा नसीमचे नाव पाकिस्तान महिला क्रिकेट संघाच्या सर्वोत्तम हिटर्समध्ये गणले जाते.

Smriti Mandhana Becomes the First Cricketer to Hit 4 Hundreds in Womens odis in a Calendar Year World Record
Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या नावे विश्वविक्रम, ‘ही’ कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला फलंदाज
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Syed Mushtaq Ali Trophy
SMAT 2024: मुंबई सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत! रहाणे-शॉच्या फलंदाजीसमोर विदर्भचा संघ पडला फिका
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
Neelam Bhardwaj becomes youngest Indian woman Batter to hit List A double hundred
१३७ चेंडूत २०० धावा! भारताच्या लेकीने घडवला इतिहास; सर्वात कमी वयात द्विशतक झळकावणारी पहिली महिला फलंदाज
Shaheen Shah Afridi becomes youngest bowler to complete 100 wickets in all 3 formats
Shaheen Afridi: शाहीन शाह आफ्रिदीचा मोठा पराक्रम, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा सर्वात तरूण गोलंदाज
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…

आयशा नसीमची क्रिकेट कारकीर्द

आयशा नसीमने पाकिस्तानसाठी ४ वन डे आणि ३० टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने ३० सामन्यांच्या टी२० कारकिर्दीत १२८च्या स्ट्राइक रेटने ३६९ धावा केल्या आहेत. वन डेमध्ये तिच्या फक्त ३३ धावा आहेत. तिने तिच्या टी२० कारकिर्दीत १८ षटकारही मारले आहेत. पाकिस्तान महिला संघासाठी टी२० इतिहासात आयशापेक्षा फक्त निदा दारने सर्वाधिक २७ षटकार मारले आहेत. मात्र तिने १३० सामने खेळले आहेत. पाकिस्तान महिला क्रिकेट संघाकडून खेळणाऱ्या आयशा नसीमचा जन्म ७ ऑगस्ट २००४ रोजी अबोटाबाद येथे झाला. फलंदाजी व्यतिरिक्त ही खेळाडू पाकिस्तानसाठी उजव्या हाताने मध्यम वेगवान गोलंदाजी करते.

हेही वाचा: BAN-W vs IND-W: आउट देताच कर्णधार हरमनप्रीत कौर भडकली, त्यानंतर असे काही केले की…; पाहा Video

मोठे षटकार ही आयशाची ओळख होती

आयशा नसीम तिच्या मोठ्या षटकारांसाठी प्रसिद्ध होती. २०२३च्या महिला टी२० विश्वचषकातील दोन सर्वात मोठे षटकार आयशाने मारले होते. भारताविरुद्धच्या सामन्यात त्याने ८१ मीटर लांब षटकार ठोकला. या स्पर्धेतील सर्वात मोठा षटकाराची नोंद तिच्या नावावर होती. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात तिने ७९ मीटर लांब षटकार मारला होता. २०२३च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही तिच्या बॅटमधून मोठमोठे षटकार निघाले होते.

Story img Loader