Ayush Badoni took flying catch in Emerging Teams Asia Cup 2024 : एसीसी टी-२० इमर्जिंग टीम एशिया कप २०२४ मध्येही टीम इंडियाचा दबदबा पाहायला मिळत आहे. भारतीय संघाने सलग दोन सामने जिंकून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचा दुसरा ग्रुप स्टेज सामना संयुक्त अरब अमिराती संघाविरुद्ध खेळला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ७ विकेट्सनी विजय मिळवला. या सामन्यादरम्यान भारतीय खेळाडू आयुष बदोनीचा एक आश्चर्यकारक झेलही पाहायला मिळाला, ज्याने सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

आयुष बदोनीचा अप्रतिम झेल –

या स्पर्धेत टीम इंडियाच्या खेळाडूंनी खूप अप्रतिम क्षेत्ररक्षण केले आहे. असेच काहीसे संयुक्त अरब अमिरातीविरुद्धही पाहायला मिळाले. यूएईच्या डावात आयुष बदोनीने एक असा झेल घेतला, जो चमत्कारापेक्षा कमी नव्हता. वास्तविक, रमणदीप सिंग या डावातील १५ वे षटक टाकत होता. या षटकात यूएईचा फलंदाज मुहम्मद जवादुल्लाने रमणदीप सिंगच्या एका चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण आयुष बदोनी लॉग-ऑनला उभा होता. हा चेंडू त्याच्यापासून दूर होता, त्यामुळे आयुष बदोनीने चपळाई दाखवली आणि धावत जात उडी मारून झेल पकडला. त्याची ही चपळाई पाहून सर्वांनाच धक्का बसला.

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Akash Deep has revealed How Virat Kohli gifted his bat that saved Gabba Test for India
Virat Kohli : ‘मी बॅट मागितली नव्हती, त्यानेच…’, गाबा कसोटी वाचवणाऱ्या आकाशदीपचा विराटच्या बॅटबद्दल मोठा खुलासा
Nitish Reddy climbs Tirupati Temple stairs on knees After Stunning Test Debut & Century vs Australia
Nitish Reddy: नितीश रेड्डी गुडघ्यावर चढला तिरूपतीच्या पायऱ्या, ऑस्ट्रेलियातील शतकानंतर देवाचे असे मानले आभार; VIDEO व्हायरल
Karun Nair ready to make a comeback to Indian team after scored 4 consecutive centuries in Vijay Hazare Trophy 2024-25
Karun Nair : त्रिशतकवीर आठ वर्षानंतर पुनरागमनासाठी सज्ज! सलग चार शतकं झळकावत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
Passenger bitten security force jawan, Vasai,
वसई : प्रवाशाने घेतला सुरक्षा बलाच्या जवानाचा चावा
Arshdeep Singh clean bowled to Ruturaj Gaikwad during MAH vs PUN match in Vijay Hazare Trophy 2025
Vijay Hazare Trophy : अर्शदीपचा अफलातून स्पेल! ऋतुराजचा त्रिफळा उडवत महाराष्ट्राच्या टॉप ऑर्डरला पाडली खिंडार, VIDEO व्हायरल
Fan who caught Kane Williamson's sixer with one hand wins Rs 90 lakh prize in SA20 2025 Match
SA20 2025 : मॅच पाहायला गेला आणि लखपती झाला, केन विल्यमसनच्या षटकाराने चाहत्याचं नशीब कसं बदललं?

आयुष बदोनीपूर्वी रमणदीप सिंगनेही गेल्या सामन्यात अप्रतिम झेल घेतला होता. रमणदीप सिंगने सीमारेषेवर एका हाताने झले पकडला होता. संयुक्त अरब अमिरातीविरुद्धही खेळाडूंनी उत्तम क्षेत्ररक्षण करत सामन्यात एकूण ७ झेल घेतले. आयुष बडोनीने या सामन्यात टीम इंडियासाठी विजयी धावाही केल्या. तो ९ चेंडूत १ चौकार आणि १ षटकारासह १२ धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला.

हेही वाचा – पृथ्वी शॉ पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; वाढतं वजन आणि शिस्तीच्या अभावामुळे मुंबई संघातून डच्चू

टीम इंडियाचा दणदणीत विजय –

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर संयुक्त अरब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि संपूर्ण संघ १६.५ षटकात १०७ धावा करून सर्वबाद झाला. अशा परिस्थितीत टीम इंडियाला सामना जिंकण्यासाठी १०८ धावांचे लक्ष्य मिळाले. जे टीम इंडियाने अवघ्या १०.५ षटकांत २ गडी गमावून लक्ष्य गाठले आणि उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले.

Story img Loader