Ayush Badoni break Shreyas Iyer record highest indivisual score in T20 cricket : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली प्रीमियर लीग २०२४ च्या २३ व्या सामन्यात दक्षिण दिल्लीचा सुपरस्टार फलंदाज आयुष बदोनीने इतिहास घडवला. आयुष बदोनीने उत्तर दिल्लीविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात १६५ धावांची खेळी साकारत भारतीय टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या खेळीची नोंद केली. याआधी भारताच्या कोणत्याही फलंदाजाने टी-२० क्रिकेटमध्ये एवढी मोठी खेळी साकारली नव्हती. या खेळीसह आयुषने श्रेयस अय्यरचा ७ वर्षे जुना विक्रमही मोडला.
आयुषने मोडला श्रेयस अय्यरचा ७ वर्ष जुना विक्रम –
भारतासाठी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी साकारण्याचा विक्रम श्रेयस अय्यरच्या नावावर होता. त्याने सिक्कीमविरुद्ध मुंबईकडून खेळताना २१ फेब्रुवारी २०१९ रोजी ५५ चेंडूत १४७ धावांची खेळी केली होती. यादरम्यान त्याने १५ षटकार आणि ७ चौकार मारले होते, परंतु आता आयुष बदोनीने ५५ चेंडूंवर १९ षटकार आणि ८ चौकारांच्या मदतीने १६५ धावांची खेळी साकारली. ज्यामुळे आयुष बदोनी श्रेयसचा विक्रम मोडत भारतासाठी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी साकारणारा फलंदाज ठरला आहे.
टी-२० क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात मोठी खेळी साकारणारे टॉप-३ फलंदाज –
- आयुष बदोनी- १६५ धावा
- श्रेयस अय्यर- १४७ धावा
- पृथ्वी शॉ- १३४ धावा
आयुष बदोनीने हॅमिल्टन मासाकाटझाला मागे टाकले –
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणाऱ्या आणि हॅमिल्टन मासाकाटझाला मागे टाकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आयुष बदोनी एकूण तिसऱ्या क्रमांकावर आहे. याआधी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत हॅमिल्टन तिसऱ्या क्रमांकावर होता, मात्र आता तो चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. हॅमिल्टनने टी-२० मध्ये नाबाद १६२ धावांची सर्वात मोठी खेळी खेळली होती, परंतु आयुषने १६५ धावांची खेळी खेळून त्याला मागे टाकले. या यादीत पहिला क्रमांक ख्रिस गेलचा आहे, ज्याने २०१३ मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध आरसीबीकडून १७५ धावांची नाबाद खेळी केली होती.
हेही वाचा – Azam Khan CPL 2024 : वेगवान बाऊन्सर गळ्यावर बसला आणि आझम खान कोसळला; काय झालं पुढे? पाहा VIDEO
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात मोठी खेळी खेळणारे टॉप-४ फलंदाज –
- ख्रिस गेल – नाबाद १५५ धावा
- आरोन फिंच- १७२ धावा
- आयुष बदोनी- १६५ धावा
- हॅमिल्टन मासाकाटझा – नाबाद १६२ धावा