Azam Khan hit by bouncer on neck in CPL 2024 : पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज आझम खान सध्या कॅरिबियन प्रीमियर लीग (सीपीएळ) २०२४ मध्ये खेळत आहे. तो गयाना ॲमेझॉन वॉरियर्स संघाचा भाग आहे. आझमने अँटिग्वा आणि बारबुडा फाल्कन्सविरुद्ध अतिशय विचित्र पद्धतीने बोल्ड आऊट झाला. त्याने ज्या पद्धतीने विकेट गमावली ती अष्टपैलू शमर स्प्रिंगरसाठी ‘गिफ्ट’पेक्षा कमी नव्हती. कारण घात बाउन्सर त्याच्या गळ्यावर आदळल्याने तो स्तब्ध झाला. काही वेळ त्याला काही समजलेच नाही की काय झाले? ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
गयानाच्या संघाला १६९ धावांचे लक्ष्य मिळाले होते. दरम्यान आझम पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. १२व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर त्याने एकही धाव घेतली नाही आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. स्प्रिंगरने तिसरा चेंडू शॉर्ट टाकला, जो २६ वर्षीय आझम खान समजला नाही. त्याने लेग साइडच्या दिशेल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, बॅटशी चेंडू कनेक्ट झाला नाही आणि चेंडू त्याच्या गळ्याला लागला.
आझम खानच्या गळ्याला लागला चेंडू –
यानंतर वेदनेने त्रस्त होऊन तो खाली बसला आणि लगेचच आपल्या गळ्याला हात लावला. दरम्यान चेंडू गळ्याला लागल्यानंतर स्टंपवर जाऊन आदळला. ज्यामुळे त्याला तंबूत परतावे लागले. तो आपल्या संघासाठी फक्त ९ धावांचे योगदान देऊ शकला, ज्यात एका चौकाराचा समावेश होता. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गयाना विरुद्ध अँटिग्वा सामना अतिशय रोमांचक होता. या सामन्याचा निकाल शेवटच्या चेंडूवर लागला.
अँटिग्वाकडून खेळणारा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर शेवटच्या षटकात १६ धावांचा बचाव करू शकला नाही. ड्वेन प्रिटोरियसने आमिरला बरोबर घेत गयानाला तीन विकेट्सने विजय मिळवून दिला. तीन चौकार मारण्याबरोबरच त्याने २० व्या षटकात षटकार मारला. त्याने १० चेंडूत नाबाद २० धावा केल्या. शाई होपने ३४ चेंडूंत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४१ धावांची खेळी केली. रोमॅरियो शेफर्डने १६ चेंडूत चार षटकार मारत ३२ धावांची शानदार खेळी साकारली.