Babar Azam Video Viral: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सतत अपयशी ठरत असल्याने तो अडचणीत आला आहे. मायदेशात एकदिवसीय आणि कसोटी मालिका गमावल्यानंतर आता त्याच्या कर्णधारपदावरही टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) नवे अध्यक्ष नजम सेठी आणि व्यवस्थापन लवकरच बाबरला तिन्ही फॉरमॅटच्या कर्णधारपदावरून हटवू शकते, असे वृत्तात म्हटले जात आहे. त्यातच आता त्याच्यावर फसवणुकीचे आरोप करण्यात आले असून त्याचे वैयक्तिक अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्यात आले आहेत.

पाकिस्तानचा स्टार खेळाडू बाबर आझमच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कर्णधारपदावरून बाबरची उचलबांगडी होण्याच्या चर्चा सुरू असताना बाबरचे पर्सनल फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्रामवरील eish. arajpoot या आयडीवर व्हिडीओ पोस्ट केले आहेत. कथित स्वरूपात तरूणीने बाबर आझमवर फसवणुकीचे आरोप केले आहेत.

rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Veteran Telugu Actor Mohan Babu
दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील बड्या कुटुंबात वाद; ज्येष्ठ अभिनेत्याने पत्रकारावर केला हल्ला, पोलिसांत तक्रार दाखल
Mohan Babu files police complaint against son Manchu Manoj
ज्येष्ठ अभिनेत्याने मुलगा अन् सूनेविरोधात दिली तक्रार; मुलानेही वडिलांवर केले आरोप
Rohit Sharma Statement on Mohammed Siraj and Travis Head Fight in IND vs AUS 2nd Test
IND vs AUS: “मर्यादा ओलांडायला नको…”, रोहित शर्माने सिराज-हेडच्या वादात भारतीय गोलंदाजाची घेतली बाजू, सामन्यानंतर केलं मोठं वक्तव्य
Salman khan baba siddique
Baba Siddique : बाबा सिद्दिकींच्या आधी सलमान खान होता हल्लेखोरांच्या रडारवर; आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक खुलासा!
Baba Siddiqui murder case Lawrence Bishnoi gang key goon suspected of involvement Mumbai news
बाबा सिद्धीकी हत्या प्रकरण: लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या महत्त्वाच्या गुंडाचा सहभागाचा संशय
asid kumar modi palak sidhwani tmkoc
TMKOC : सोनूची भूमिका करणाऱ्या पलक सिधवानीच्या आरोपांना असित मोदींचे प्रतिउत्तर म्हणाले, “तिचे मानधन…”

सोशल मीडियावर फोटोज आणि व्हिडिओ व्हायरल

या सर्व अटकळांमध्ये बाबर आझमसाठी आणखी एक मोठी अडचण समोर आली आहे. सोशल मीडियावर काही वैयक्तिक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये बाबर आझम दिसत असल्याचा दावा केला जात आहे. बाबर हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा दावाही केला जात आहे.

@niiravmodi अकाउंटवरून ट्विटरवर एक व्हिडिओ आणि फोटो शेअर करण्यात आला आहे. असा दावा करण्यात आला आहे की व्हिडिओमध्ये दिसणारा व्यक्ती बाबर आझम असून तो एका मुलीसोबत व्हिडिओ चॅट करताना दिसत आहे. एका इंस्टाग्राम पोस्टचा स्क्रीनशॉट देखील शेअर करण्यात आला होता, जो eish.arajput1 अकाऊंटने शेअर केल्याचे दिसते.

नेमकं प्रकरण काय आहे ते जाणून घेऊ

बाबर आझम पाकिस्तानी संघाचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र, कर्णधार बाबर आझमचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याला पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये बाबर विचित्र अवस्थेत दिसत असल्याचे पाहायला मिळत आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याने आपल्याच सहकारी खेळाडूच्या प्रेयसीसोबत असे अश्लील कृत्य केले आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

हेही वाचा: Australian Open 2023: पहिलाच सामना खेळायला उतरला अन् चक्क रॅकेट गेली चोरीला; राफेल नदालसोबत अजबच घडलं, पाहा video

इन्स्टाग्रामवरील ईशा राजपूत नावाच्या हँडलवर फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यात दिसणारी व्यक्ती पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम असल्याचा दावा करण्यात आला आहे. या फोटो आणि व्हिडिओंसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘तुमने जो किया, तुमको वही मिला.’ पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खूप लोकप्रिय होत चालला होता त्यावेळी एका आरोपामुळे तो वादात सापडला होता. एका महिलेने बाबर आझमवर लग्नाच्या बहाण्याने १० वर्षे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. बाबरवर गंभीर आरोप करताना संबंधित महिलेने सांगितले होते की, मी गरोदर राहिल्यावर बाबरने मला मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली. ज्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Story img Loader