Babar Azam New Record: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. कारण तो १०० वन डे सामन्यातील डावानंतर सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान बाबरने हे स्थान गाठले. आझमने हाशिम आमलाला मागे टाकले. दुसरीकडे, विराट कोहली या यादीत नवव्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात बाबर आझमने ६ चौकारांसह शानदार ५३ धावा केल्या.

बाबरने १०० एकदिवसीय डावात १८ शतके आणि २७ अर्धशतके केली

अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात बाबरला चांगली कामगिरी करता आली नाही कारण फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमानने त्याला भोपळाही न फोडता तंबूत पाठवले. मात्र, दुसऱ्या सामन्यात बाबर आझमने दमदार खेळी करत अर्धशतक झळकावले. बाबरचा हा १०० वा एकदिवसीय सामना आहे आणि वन डे क्रिकेटमध्ये पहिल्या १०० इनिंग्जमध्ये ५०००हून अधिक धावा करणारा तो जगातील एकमेव फलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत ९९ डावामध्ये १८ शतकं झळकावली आहेत. तटस्थ ठिकाणी १०० वन डे सामना खेळणारा पाकिस्तान पहिला संघ ठरला आहे.

Babar Azam was advised by Virender Sehwag
Babar Azam : ‘जेव्हा तुमचा खराब काळ चालू असतो, तेव्हा…’, वीरेंद्र सेहवागने बाबर आझमला दिला महत्त्वाचा सल्ला
Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक…
PAK vs ENG Ben Stokes loses bat gets stumped during Pakistan vs England 2nd test match video viral
PAK vs ENG : बॅट उडाली, विकेट गेली, कॅप्टन गेला, सामनाही गेला…बेन स्टोक्स अनोख्या पद्धतीने झाला बाद; VIDEO व्हायरल
PAK vs ENG Ben Stokes on Babar Azam
PAK vs ENG : ‘तो पाकिस्तान क्रिकेटचा…’, बाबर-शाहीन आणि नसीम यांना संघातून डच्चू देण्यावर बेन स्टोक्स काय म्हणाला? पाहा VIDEO
Rohit Sharma Video post on instagram
Rohit Sharma : ‘वेडा झाला आहेस का…’, रोहित शर्मा चाहत्याला असं का म्हणाला? VIDEO होतोय व्हायरल
Marnus Labuschagne Stuns Umpire With Unorthodox Field During Sheffield Shield Match Video Goes Viral
VIDEO: मार्नस लबूशेनने उभा केला पंचांच्या मागे क्षेत्ररक्षक; व्हीडिओ पाहून तुम्ही चक्रावून जाल
Ab De Villiers on Rohit Sharma
रोहित फाफ डू प्लेसिसच्या जागी RCB चे नेतृत्त्व करणार का? एबी डिव्हिलियर्सने विराटचा उल्लेख करत दिले उत्तर
Virat Kohli Behind Babar Azam Pakistan Captaincy Resign Pak Media Reveals Inside Story
Babar Azam: विराट कोहलीमुळे बाबर आझमने कर्णधारपदाचा दिला राजीनामा? पाकिस्तानी पत्रकाराच्या पोस्टने चाहते आश्चर्यचकित

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर बाबरला वेगवान गोलंदाज फजलहक फारुकीने ६६ चेंडूत ५३ धावा करून बाद केले. त्याच्या खेळीत सहा चौकारांचा समावेश होता. त्याचवेळी सलामीवीर इमाम-उल-हकनेही फलंदाजी करत शानदार अर्धशतक पूर्ण केले. याआधी अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक-फलंदाज रहमानउल्ला गुरबाज याने १५१ धावांची सर्वोच्च आंतरराष्ट्रीय धावसंख्या उभारून संघाला ३०० धावांपर्यंत मजल मारली.

आशिया चषक २०२३ मध्ये होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. त्याचबरोबर या सामन्यादरम्यान मैदानावर लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. आता या सामन्यात कोणता संघ कोणावर मात करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा: Asia Cup 2023: रोहित-हार्दिक यो-यो टेस्ट झाला पास, ‘या’ चार खेळाडूंना मिळाली सूट, स्पेशल कॅम्पच्या पहिल्या दिवशी काय घडलं?

अफगानिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात काय झाले?

पाकिस्तानने अफगाणिस्तानविरुद्धची तीन एकदिवसीय मालिका जिंकली आहे. त्यांनी दुसरी वन डे एका विकेटने जिंकून मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. महिंदा राजपक्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेला पहिला सामना पाकिस्तानने १४२ धावांनी जिंकला. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याने ५० षटकांत पाच गडी बाद ३०० धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने ४९.५ षटकांत नऊ गडी गमावून ३०२ धावा केल्या.

हेही वाचा: Bray Wyatt: माजी WWE चॅम्पियन ब्रे वॅटने वयाच्या ३६व्या वर्षी घेतला जगाचा निरोप, क्रीडाविश्वात पसरली शोककळा

पाकिस्तानकडून इमाम-उल-हकने सर्वाधिक ९१ धावा केल्या. शतक झळकावताना तो हुकला. कर्णधार बाबर आझमने ५३ धावा केल्या. शादाब खानने शेवटच्या षटकात ३५ चेंडूत शानदार ४८ धावा केल्या. फखर जमानने ३०, इफ्तिखार अहमदने १७ आणि आगा सलमानने १४ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून फारुकीने तीन आणि मोहम्मद नबीने दोन विकेट्स घेतले.