Babar Azam said I am proud of our fast bowlers: आशिया चषक २०२३ चा तिसरा सुपर फोर सामना १० सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. हा सामना रविवारी कोलंबोमध्ये होणार आहे. या हाय-व्होल्टेज सामन्यापूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला विश्वास आहे की, त्यांचा संघ श्रीलंकेच्या परिस्थितीशी परिचित आहे आणि कोलंबोमध्ये भारताविरुद्ध वर्चस्व गाजवेल. त्याचबरोबर त्याने सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत आपल्या वेगवान गोलंदाजीचा अभिमान असल्याचे सांगितले.
बाबर आझम म्हणाला की मला आमच्या वेगवान गोलंदाजांचा खूप अभिमान आहे. त्यांच्यामुळे भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या बलाढ्य संघांवर वर्चस्व गाजवत आहेत. तो पुढे म्हणाला की फक्त वेगवान गोलंदाज संघांना सामने जिंकून देतात आणि पाकिस्तान क्रिकेट संघ सुपर फोर सामन्यात भारताचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. जर आपण कोलंबोच्या हवामानाबद्दल बोललो तर बाबर आझम म्हणाले की तेथे हवामान स्वच्छ दिसत आहे आणि सामना होईल अशी आशा आहे, परंतु तो प्रत्येक परिस्थितीसाठी तयार आहे.
आमच्या वेगवान गोलंदाजांचा अभिमान आहे – बाबर आझम
बाबर आझम सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत म्हणाला, “मला आमच्या वेगवान गोलंदाजांचा अभिमान आहे. आम्ही सर्व विरोधी संघांवर वर्चस्व राखले आहे आणि याचे श्रेय आमच्या वेगवान गोलंदाजीला जाते. माझा विश्वास आहे की फक्त वेगवान गोलंदाजच मोठे सामने आणि स्पर्धा जिंकतात. मला माझ्या गोलंदाजांवर पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या यशामागील रहस्य हे आहे की ते एकसंध राहतात आणि स्वतःवर विश्वास ठेवतात.”
हेही वाचा – Team India: विराट कोहलीने पुन्हा एकदा जिंकली चाहत्यांची मनं, कुत्र्याच्या पिल्लासोबत खेळतानाचा VIDEO व्हायरल
बाबर आझम पुढे म्हणाला, “एखाद्या दिवशी एक गोलंदाज कामगिरी करू शकला नाही, तर दुसरा त्याची जबाबदारी घेतो आणि त्याची भरपाई करतो. आम्ही फक्त त्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करत आहोत. ज्यावर आम्ही नियंत्रण ठेवू शकतो. कोलंबो येथे चार दिवस पाऊस पडला, पण सूर्य ज्या प्रकारे मावळला आहे, उद्या पाऊस पडेल असे वाटत नाही. पण आम्हाला जो काही वेळ मिळेल, आम्ही त्याचा सर्वोत्तम वापर करण्याचा प्रयत्न करू.”
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, इशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (राखीव खेळाडू).
पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान, मोहम्मद हारिस, शादाब खान, मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अश्रफ, हरिस रौफ, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहीन आफ्रिदी, सौद शकील, तय्यब ताहिर (राखीव खेळाडू).