Babar Azam and Mohammad Nabi’s dispute: पाकिस्तानने गुरुवारी एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा एक विकेटने पराभव केला. शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर बाबर आझमच्या संघाने मोठ्या मुश्किलीने विजय मिळवला. सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर अफगाणिस्तानचा क्रिकेटर मोहम्मद नबीवर चांगलाच रागावलेला दिसत होता. अफगाणिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करताना त्याने मोहम्मद नबीवरही संताप व्यक्त केला.
सामना संपल्यानंतर जेव्हा सर्व खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करत होते, तेव्हा पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाह बाबरजवळ आला आणि काहीतरी म्हणाला. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये, यानंतर बाबर जातो आणि मोहम्मद नबीशी रागाने बोलतो. या व्हिडीओवरून असा अंदाज लावला जात आहे की, पाकिस्तानी कर्णधार अगदी मोकळेपणाने बोलत होता.
सामना संपल्यानंतर पाकिस्तानी कर्णधार म्हणाला, ‘विजयाचे श्रेय खेळाडूंना जाते. आम्ही फलंदाजीला सुरुवात केली, तेव्हा आमचा प्रयत्न फक्त भागीदारी करण्याचा होता. आम्हाला फक्त ४० षटकांपर्यंत फलंदाजी करायची होती आणि त्यानंतर काय होते ते पाहायचे होते. खालच्या ऑर्डरमध्येही आमच्याकडे बरीच फलंदाजी आहे. नसीमने या कठीण परिस्थितीत चांगली फलंदाजी केली आहे. क्रिकेटमध्ये सुधारणेला नेहमीच वाव असतो. आपण कधीच समाधानी नसतो. तुम्हाला तुमचा नैसर्गिक खेळ खेळावा लागेल. मालिकेतील शेवटच्या सामन्याची प्रतीक्षा आहे आणि आम्हाला ही लय कायम ठेवायची आहे.
गुरबाजने बाबर आणि धोनीला टाकले मागे –
आपल्या शतकाच्या जोरावर गुरबाज पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावणारा अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू ठरला. याशिवाय, गुरबाज २२ डावांनंतर एका फलंदाजाकडून सर्वाधिक शतके (५) करणारा संयुक्त तिसरा क्रमांक बनला आहे. या प्रकरणात त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला मागे टाकले आहे, ज्याने २५डावांमध्ये हा पराक्रम केला आहे. यासोबतच तो पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा यष्टीरक्षक फलंदाज बनला आहे. यापूर्वी हा विक्रम धोनीच्या नावावर होता. ज्याने १४८ धावा केल्या होत्या.
पाकिस्तानकडून शादाब खानने ३५ चेंडूत ४८ धावा केल्या. त्याने पाकिस्तानला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले आणि विजयाच्या दारात पोहोचवले.पाकिस्तानने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. इमाम-उल-हक आणि बाबर आझम यांनी शानदार अर्धशतके झळकावली. तत्पूर्वी, रहमतुल्ला गुरबाजच्या शानदार १५१ धावांच्या जोरावर अफगाणिस्तानने ५० षटकांत ३०० धावा केल्या. इब्राहिम झद्रानने ८० धावांची खेळी केली.