Babar Azam Wraps Towel for Prayer Meet Video: पाकिस्तान संघाचा व्हाईट बॉल कर्णधार बाबर आझमची बॅट सध्या शांत असल्याने त्याला ट्रोल केले जात आहे. बाबर आझम हा पाकिस्तानचा एक उत्कृष्ट फलंदाज आहे. वनडेच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा फलंदाज असलेला बाबर आझमच्या बॅटमधून धावांचा पाऊस पाहायला मिळत नाहीय. त्यामुळे सध्या त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. श्रीलंकेविरूद्धच्या कसोटी मालिकेत बाबर आझम स्वस्तात बाद झाला, यानंतर त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. पण आता त्याचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्यो तो टॉवेल गुंडाळून नमाज पठणासाठी जातो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – AFG vs NZ: “आम्ही इथे कधीच परत येणार नाही…”, ग्रेटर नोएडा स्टेडियमच्या गैरव्यवस्थापनावर अफगाणिस्तान संघ संतापला, नेमकं काय घडलं?

बाबर आझम मैदानात टॉवेल बांधून का आला?

बाबर आझम संघासह हाफ पँट घालून सराव करत होता. सरावानंतर सर्व संघातली खेळाडू नमाज पठणासाठी एकत्र जमले होते. बाबर हाफ पँट घालून सराव करत होता, पण नमाजासाठी तो मोठी ट्राऊजर शोधत होता पण शेवटपर्यंत त्याला काही मिळाली नाही आणि मग तो टॉवेल बांधून नमाजासाठी गेला आणि त्याने संघासह नमाज पठण केले. त्यानंतर त्याने टॉवेल बाजूला घालून ठेवले आणि पुन्हा सरावासाठी गेला. मैदानात सराव सत्र पाहण्यासाठी आलेला चाहत्यांनी त्याला चिअर करत त्याच्या या कृतीचे कौतुक केले. या प्रसंगाचे फोटो आणि व्हीडिओ व्हायरल झाले आहेत.

२०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील गट सामन्यातून बाहेर पडल्यानंतर बाबर आझमला पांढऱ्या चेंडूच्या कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले आणि त्याच्या जागी शाहीन शाह आफ्रिदीला कर्णधारपद देण्यात आले होते, पण त्याच्याही वाईट कामगिरीनंतर त्याला या पदावरून कमी केले.

हेही वाचा – India Captain: रोहित शर्मानंतर कोण होणार भारताचा तिन्ही फॉरमॅटमधील कर्णधार? माजी भारतीय खेळाडूने सांगितली दोन नावं

कसोटीत बाबरने राजीनामा दिल्यानंतर, शान मसूदची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती, परंतु बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत ०-२ अशा पराभवानंतर, शान मसूदलाही पदावरून कमी करण्याची मागणी केली जात आहे. पीसीबीच्या एका सूत्राने मात्र पीटीआयला सांगितले की, मसूद आणि बाबरला कर्णधारपदावरून कमी केल्याच्या फक्त अफवा आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Babar azam in towel video viral he misplaces trousers so wraps towel for pakistan trainings prayer meet bdg