Babar Azam Wiaan Mulder Fight Video SA vs PAK: सध्या पाकिस्तान वि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना केपटाऊनमध्ये खेळवला जात आहे. या कसोटीत पाकिस्तानने तिसऱ्या दिवशी चांगले पुनरागमन केले. आफ्रिकेच्या संघाने पहिल्या डावात विक्रमी ६१५ धावा केल्या तर याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात १९४ धावांवर सर्वबाद झाला. यानंतर पाकिस्तानला फॉलोऑन देण्यात आला, ज्यात पाकिस्तानने दणदणीत सुरूवात केली आणि विक्रमी भागीदारी रचली. दरम्यान आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज वियान मुल्डर आणि बाबर आझम एकमेकांशी मैदानावर भिडले.

बाबरने पहिल्या डावात दमदार अर्धशतक झळकावले. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्याने शानदार फलंदाजी केली. पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या ६१५ धावांना प्रत्युत्तर देताना पाकिस्तानचा संघ ९१४ धावांवर बाद झाला. फॉलोऑन मिळाल्यानंतर पाकिस्तानने चांगली सुरूवात करत १ बाद २१३ धावा केल्या. मसूद १०२ धावा करून क्रीजवर आहे. तर फॉर्मात परतलेला बाबर आझम ८१ धावा करत बाद झाला. पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद आणि बाबर यांनी २०५ धावांची विक्रमी भागीदारी केली.

Shreyas Iyer Reveals How He Replaces Virat Kohli on Rohit Sharma Phone Call in India Playing XI
IND vs ENG: “मी रात्री चित्रपट बघत होतो अन् रोहितचा फोन…”, श्रेयस अय्यरने सांगितलं कसं झालं टीम इंडियात पुनरागमन, सामन्यानंतर काय म्हणाला?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
IND vs ENG Fans asked Rohit Sharme retire from the ODI after he dismissed for just 2 runs in Nagpur
IND vs ENG : ‘रोहित शर्माला निवृत्ती घ्यायला सांगा…’, दोन धावांवर बाद झाल्यानंतर चाहत्यांनी हिटमॅनला केले ट्रोल
Babar Azam Loses Phone and Contacts Shares Post on Social Media Ahead Of Champions Trophy
Babar Azam: बाबर आझम चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी वेगळ्याच कारणामुळे चिंतेत, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
Phil Salt departs for 43 after suicidal run out by Shreyas Iyer
IND vs ENG: आधी ३२ मी. वायूवेगाने धावला अन् रॉकेट थ्रोसह अय्यरने केलं रनआऊट, सॉल्टला महागात पडली एक धाव; पाहा VIDEO
SL vs AUS Josh Inglis scores century on debut test match in front of parents breaks many records at Galle
SL vs AUS : जोश इग्लिसचे कसोटी पदार्पणात विक्रमी शतक! मोडले अनेक विक्रम
Hardik Pandya Throws Bat Curses Himself After His Wicket in IND vs ENG 3rd T20I Video Viral
IND vs ENG: हार्दिक पंड्याने आऊट झाल्यावर मैदानातच काढला राग, बॅट फेकली अन्… VIDEO व्हायरल
IND vs ENG Tilak Varma reveals why he targeted England best bowler Jofra Archer in Chepauk T20I Match
IND vs ENG : तिलक वर्माने जोफ्रा आर्चरला का केलं होतं लक्ष्य? सामन्यानंतर स्वत:च केला खुलासा; म्हणाला, ‘जेव्हा विकेट…’

हेही वाचा – Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलला नशेत चालताही येईना, घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ‘तो’ Video व्हायरल, मद्यधुंद अवस्थेत…; नेमकं काय घडलेलं?

मुल्डर आणि बाबर आझम मैदानातच भिडले

पाकिस्तानच्या दुसऱ्या डावातील ३२व्या षटकात ही घटना घडली. मुल्डरच्या गोलंदाजीवर बाबरने गोलंदाजाच्या दिशेने चेंडू खेळला. फॉलो-थ्रूमध्ये मुल्डरने चेंडू पकडला आणि बॅट्समनकडे त्याच वेगाने परत फेकला. दरम्यान चेंडू खेळल्यानंतर बाबर आझम क्रिझच्या बाहेर येऊन उभा होता आणि गोलंदाजाने मारलेला चेंडू वाईड अँगलवर पडला आणि तो बाबरच्या पायाला लागला. बाबर चेंडू खेळल्यानंतर त्याच्या उजव्या बाजूला गेला आणि नेमका विल्डरने टाकलेला चेंडू तिथे पडला आणि बाबरला लागला.

हेही वाचा – IND vs AUS: “आम्ही कोण? आम्हाला क्रिकेट थोडंच येतं…”, सुनील गावस्कर भारताच्या मालिका पराभवानंतर रोहित शर्मावर संतापले?

यष्टिरक्षक काइल वॅरेननेही यष्टीमागे चेंडू पकडल्यानंतर धावबाद करण्याचा प्रयत्न केला. पण बाबरने चेंडू लागताच मुल्डरला विकेट तिथे असल्याचे खुणावत सांगितले. यानंतर बाबर आणि मुल्डर यांच्यात बाचाबाची झाली. स्टंप माइकमध्ये मुल्डरचं बोलणं रेकॉर्ड झालं आणि त्यात तो बाबरला म्हणत होता “तू क्रीजच्या बाहेर होतास!” यानंतर मसूद, एडन माक्ररम आणि पंचांनी हस्तक्षेप करत वातावरण शांत केलं.

Story img Loader