Babar Azam Breaks Rohit Sharma Record: दुसऱ्या टी- २० सामन्यातही पाकिस्तानने न्यूझीलंडचा ३८ धावांनी पराभव करून पाच सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात बाबर आझमने विश्वविक्रम करून कमाल केली. टी-२० इंटरनॅशनलमध्ये बाबरने त्याच्या करिअरचं तिसरं शतक ठोकून धमाका केला. बाबरने ५८ चेंडूत १०१ धावांची नाबाद खेळी केली. या इनिंगमध्ये त्याने ११ चौकार आणि ३ षटकार मारले. त्याच्या स्ट्राईक रेट १७४.१४ एव्हढा राहिला आहे.

बाबरच्या स्ट्राईक रेटवरून खूप चर्चा रंगली आहे. परंतु, दुसऱ्या टी-२० मध्ये पाकिस्तानी कर्णधाराने धडाकेबाज फलंदाजी करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. बाबरच्या धावांच्या जोरावर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ४ विकेट्स गमावत १९२ धावा केल्या. त्यानंतर प्रत्युत्तरात न्यूझीलंडने २० षटकांत ७ विकेट्स गमावत १५४ धावाच केल्या. पाकिस्तानी गोलंदाजांनी पुन्हा एकदा कहर केला आणि किवी फलंदाजांच्या नाकीनऊ आणले. हारिस रौफने चमकदार कामगिरी करत ४ विकेट्स घेतले.

Jasprit Bumrah and Tabraiz Shamsi have similar T20I stats
Jasprit Bumrah : तबरेझ शम्सीच्या पोस्टने क्रिकेट विश्वाला दिला आश्चर्याचा धक्का! जसप्रीत बुमराहबरोबर घडला असा योगायोग की विश्वासच बसणार नाही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sanju Samson Tilak Varma Smash World Record in Johannesburg with Fiery Centuries in T20I IND vs SA
IND vs SA: तिलक वर्मा-संजू सॅमसनचे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’, जोहान्सबर्गमध्ये लावली विक्रमांची चळत; वाचा १० अनोखे विक्रम
Arshdeep Singh Becomes India Most Successful T20I Fast Bowler Surpasses Jasprit Bumrah and Bhuvneshwar Kumar with 92 Wickets IND vs SA
IND vs SA: अर्शदीप सिंगने बुमराह-भुवनेश्वरला मागे टाकत घडवला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिला वेगवान गोलंदाज
Sanju Samson reach 39th position in ICC T20I rankings
Sanju Samson : संजू सॅमसनची आयसीसी टी-२० क्रमवारीत मोठी झेप! सलग दोन सामन्यात शतक झळकावत पटकावले ‘हे’ स्थान
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद
Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
Ranji Trophy Mumbai Crush Odisha By An Innings & 103 Runs
Ranji Trophy : शम्स मुलानीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने ओडिशाचा उडवला धुव्वा! एक डाव आणि १०३ धावांनी चारली धूळ

नक्की वाचा – Video: पहिल्याच षटकात विराट कोहलीची दांडी गुल; अनुष्का शर्माची रिअ‍ॅक्शन पाहून तुम्हीही व्हाल थक्क

बाबर आझमचा करिष्मा

टी-२० इंटरनॅशनलमध्ये शतक ठोकणाऱ्या बाबर आझमने विश्वक्रिकेटच्या दिग्गज फलंदाजांना आव्हान दिलं आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जास्त शतकांची नोंद रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहितने चार शतक ठोकले आहे. आता बाबरने ३ शतकांपर्यंत पोहोचल्याने येणाऱ्या काळात तो रोहित शर्माचा विक्रम मोडेल, असे संकेत त्याच्याकडून देण्यात आले आहेत. आतापर्यंत तीन शतक ठोकण्याची कामगिरी अनेक खेळाडूंनी केली आहे. यामध्ये सूर्यकुमार यादव, कॉलिन मुनरो, एस डाविजी, ग्लेन मॅक्सवेल यांच्या नावाचा समावेश आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये ३ शतक ठोकणारा जगातील पहिला कर्णधार

बाबरने टी-२० इंटरनॅशनलमध्ये तीन शतक ठोकणारा जगातील पहिला कर्णधार बनला आहे. बाबरशिवाय अन्य कोणत्याही कर्णधाराने अशी कामगिरी केली नाहीय. याआधी बाबरने २०२१ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, तसंच २०२२ मध्ये इंग्लंडविरोधात टी-२० इंटरनॅशनलमध्ये शतक ठोकलं होतं. रोहित शर्माने कर्णधार म्हणून टी-२० क्रिकेटमध्ये २ शतक ठोकले आहेत.