भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. २०२१ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेतही दोन्ही संघ आमनेसामने आले होते, जिथे पाकिस्तानने १० गडी राखून विजय मिळवला होता. या सामन्यात नाणेफेकीच्या वेळी दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये काय घडले, हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला २४ ऑक्टोबर रोजी झालेल्या या सामन्यादरम्यान विराट कोहलीशी काय बोलणे झाले, याबद्दल विचारण्यात आले.
या प्रश्नाला उत्तर देताना पाकिस्तानी कर्णधाराने याबाबत काहीही सांगणार नसल्याचे सांगितले. समा टीव्हीच्या वृत्तानुसार, बाबर आझमला नाणेफेकीपूर्वी विराट कोहलीला काय झाले असे विचारण्यात आले. याला उत्तर देताना आझम म्हणाले, ”मी ते सर्वांसमोर उघड करणार नाही.”
टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये प्रथम फलंदाजी करताना भारताने पाकिस्तानला १५२ धावांचे लक्ष्य दिले होते, जे पाकिस्तानने एकही विकेट न गमावता पूर्ण केले. मोहम्मद रिझवानने ७९ आणि बाबर आझमने ६८ धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ५७ धावा केल्या.
हेही वाचा – ‘‘आम्ही त्याला फोन केला, पण…”, रोहित कॅप्टन झाल्यामुळं विराट नाराज? मुंबईत केला ‘असा’ प्रकार!
भारत सुपर १२ च्या टप्प्यातूनच बाहेर पडला. दुसरीकडे, पाकिस्तान बाद फेरीसाठी पात्र ठरला होता. जिथे त्यांना उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. बाबर आझमने या स्पर्धेत सर्वाधिक ३०३ धावा केल्या. त्याने ६ डावात ६०.६०च्या सरासरीने धावा केल्या, त्यामध्ये त्याने ४ अर्धशतकेही झळकावली.