Babar Azam Quits Pakistan Captaincy: पाकिस्तान क्रिकेट कायमचं चर्चेचा विषय राहिला आहे. पण यावेळेस पाकिस्तानचा टी-२०, वनडे संगाचा कर्णधार बाबर आझमने मध्यरात्री एक पोस्ट शेअर करत सर्वांनाच धक्का दिला. पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबरने पाकिस्तान संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. बाबरने मध्यरात्री एक्सवर चाहत्यांबरोबर ही माहिती शेअर केली. बाबरने वर्षभरात दुसऱ्यांदा कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.

बाबर आझमने यापूर्वी २०२३ च्या विश्वचषकानंतर पाकिस्तानच्या तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले होते. पण त्यानंतर २०२४ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी त्याला पांढऱ्या चेंडूच्या संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. आता पुन्हा एकदा त्याने संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. बाबरची पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे.

Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Shabana Azmi
शबाना आझमी व जावेद अख्तर यांनी नाते संपवण्याचा घेतलेला निर्णय; खुलासा करीत म्हणाल्या, “आम्ही तीन महिने…”
ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…
Hafiz Assad statue vandalized
असाद घराण्याची पाच दशकांची सत्ता संपुष्टात
Order to seize Ajit Pawar property cancelled Mumbai news
शपथ घेतली, चिंता मिटली; अजित पवारांना दिलासा, मालमत्तेवर टाच आणण्याचा आदेश रद्द

हेही वाचा – IND vs BAN: “भले आम्ही १०० वर ऑल आऊट झालो असतो पण…”, भारताच्या विजयानंतर रोहित शर्माचं मोठं विधान, नेमकं म्हणाला तरी काय?

बाबरने पोस्ट शेअर करत लिहिले – “प्रिय चाहत्यांनो, आज मी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती देत आहे. गेल्या महिन्यात पीसीबी आणि संघ व्यवस्थापनाला दिलेल्या अधिसूचनेनुसार मी पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. या संघाचे नेतृत्व करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. पण आता मी पदावरून पायउतार होत, माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आहे. कर्णधारपद भूषवणे हा एक खूपच चांगला अनुभव होता, पण त्यामुळे कामाचा ताणही वाढला. आता मला माझ्या कामगिरीला प्राधान्य द्यायचे आहे, माझ्या फलंदाजीचा आनंद घ्यायचा आहे आणि कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे.”

हेही वाचा – WTC Points Table मध्ये भारताची मोठी झेप, अंतिम फेरीसाठी दावेदारी मजबूत

बाबर पुढे म्हणाला की, “कर्णधारपदावरून पायउतार झाल्यामुळे आता मला पुढे काय करायचं आहे याची स्पष्टता मिळेल आणि मला माझ्या खेळावर आणि वैयक्तिक विकासावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळेल. चाहत्यांच्या अतूट पाठिंबा आणि विश्वासाबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. चाहत्यांचा उत्साह माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मी एक खेळाडू म्हणून संघासाठी योगदान देत राहण्यास उत्सुक आहे. तुमच्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद.”

हेही वाचा – IND vs NZ: भारत दौऱ्यापूर्वी टीम साऊदीकडून न्यूझीलंडच्या कर्णधारपदाचा राजीनामा, ‘या’ खेळाडूकडे संघाची कमान

२०२० मध्ये बाबरला पाकिस्तान क्रिकेट संघाची कमान मिळाली. त्यावेळी पीसीबीने त्याला तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार बनवले होते. कर्णधार म्हणून बाबरचा खेळही उत्कृष्ट होता, पण २०२३ च्या विश्वचषकात संघाच्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर त्याच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित झाले आणि त्यानंतर विश्वचषकानंतर त्याने कर्णधारपद सोडले. पण या वर्षी, टी-२० विश्वचषकापूर्वी, त्याला पुन्हा पांढऱ्या चेंडूचा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले, पण भारत आणि अमेरिकेविरुद्धचे सामने पराभूत झाल्याने पाकिस्तान गट टप्प्यातून बाहेर पडला.

Story img Loader