Babar Azam revealed that his game improved due to the guidance of Virat Kohli: आशिया कप २०२३ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना २ सप्टेंबर रोजी होणार आहे. या सामन्यात, आधुनिक युगातील महान क्रिकेटपटूंपैकी एक असलेला विराट कोहली आणि बाबर आझम आमनेसामने असतील. हे दोन दिग्गज या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी असतील पण मैदानाबाहेर ते एकमेकांचा आदर करतात. बाबर आणि विराट हे दोघेही अनेक प्रसंगी एकमेकांचे कौतुक करताना दिसले आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत बाबरने सांगितले की कोहलीच्या सल्ल्याचा त्याच्या यशात किती वाटा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाबरने संघाला मिळवून दिला विजय –

नेपाळ विरुद्ध पाकिस्तानच्या आशिया चषक २०२३ च्या सलामीच्या सामन्यापूर्वी, बाबरने विराटचे आभार मानले. बाबर म्हणाला की जेव्हा कोहलीसाखा खेळाडू एखाद्याची प्रशंसा करतो, तेव्हा तो पाकिस्तानच्या कर्णधाराला खूप ‘आत्मविश्वास’ देतो. बाबर आझमने नेपाळविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने स्वतः १५१ धावांचे योगदान दिले. ही आशिया चषक इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाची वैयक्तिक धावसंख्या ठरली.

कोहलीने बाबरला दिला होता खास सल्ला –

बुधवारच्या सामन्यापूर्वी, बाबर स्टार स्पोर्ट्सशी गप्पा मारण्यासाठी बसला आणि त्याने विराट कोहलीशी झालेल्या संभाषणाचा खुलासा केला. ज्यामुळे बाबर आझमला फलंदाजीत सुधारणा करण्यास मदत झाली. बाबर आझम म्हणाला, “२०१९ च्या विश्वचषकादरम्यान जेव्हा मी विराट कोहलीला भेटलो, तेव्हा तो त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर होता. तो अजूनही त्याच्या शिखरावर आहे. मी त्याला काही प्रश्न विचारले, त्याने उदारपणे समजावून सांगितले. मी त्याच्याकडून खूप काही शिकलो आहे.”

हेही वाचा – Asia Cup 2023: बांगलादेशविरुद्ध घरच्या मैदानाचा फायदा घेण्यासाठी श्रीलंका सज्ज, पाहा दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

पाकिस्तान संघाचा कर्णधार पुढे म्हणाला, ”चांगले वाटते, जेव्हा कोणी असे काही बोलते, विराटने माझ्याबद्दल जे सांगितले, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. तो माझ्याबद्दल जे बोलला, त्याने मला खूप आत्मविश्वास मिळाला.”

हेही वाचा – Asia Cup 2023: बाबर आझमने रचला इतिहास! कोहली-आमलाला मागे टाकत ब्रायन लाराच्या ‘या’ विक्रमाशी केली बरोबरी

बाबर आझम मात्र सध्या विराट कोहलीला मागे टाकून जगातील नंबर वन फलंदाज बनला आहे. बाबर आझमने अवघ्या १०० एकदिवसीय सामन्यांमध्ये १९ शतके ठोकली असून ५००० हून अधिक धावा केल्या आहेत. बाबर आझमने या प्रकरणात विराट कोहलीला मागे टाकले आहे. बाबर आझमचे आशिया कपमधील पदार्पणही उत्कृष्ट ठरले आहे. बुधवारी झालेल्या नेपाळविरुद्धच्या सामन्यात बाबर आझमने १५१ धावांची उत्कृष्ट खेळी केली. बाबर आझमचे आव्हान पेलणे भारतीय गोलंदाजांसाठी सोपे जाणार नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Babar azam revealed that his game improved due to the guidance of virat kohli watch video vbm
Show comments