Babar Azam scored his 19th ODI century in ODI: आशिया चषक स्पर्धेच्या १६व्या हंगामाला बुधवारी (३० ऑगस्ट) सुरुवात झाली. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात नेपाळसमोर यजमान पाकिस्तानचे आव्हान आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तान संघाकडून बाबर आझमने शानदार शतक झळकावले. या शतकामुळे सईद अनवर विक्रम धोक्यात आला आहे. त्याने पाकिस्तानसाठी २० शतके झळकावली आहेत.
बाबर आझमने नेपाळविरुद्धच्या आशिया कपच्या पहिल्या सामन्यात शानदार शतक झळकावले. बाबरने कारकिर्दीतील १९वे शतक झळकावले आहे. त्याने ४२व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर दोन धावा घेत आपले शतक पूर्ण केले. त्याने १०९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. दुसरीकडे इफ्तिखार अहमदने अर्धशतक झळकावले. पाकिस्तानने ४२ षटकात ४ विकेट गमावत २२८ धावा केल्या आहेत. बाबर १०२ आणि इफ्तिखार ५१ धावांवर नाबाद आहे.
बाबर आझमने मोडला हाशिम आमलाचा विक्रम –
बाबर आझम एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १९शतके झळकावणारा फलंदाज ठरला. त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू हाशिम आमलाचा विक्रम मोडला. त्याने १०२ डावात १९ शतके झळकावली. हाशिम आमलाने १०४ सामन्यात १९ शतके झळकावली आहेत. विराट कोहलीने १२४ सामने खेळून १९ शतके झळकावली होती. डेव्हिड वॉर्नरने १३९ आणि एबी डिव्हिलियर्सने १७१ सामने घेतले होते.
मोहम्मद युसूफला टाकले मागे –
बाबर आझमचे हे ३१ वे शतक होते. त्याने वनडेमध्ये १९, कसोटीत ९आणि टी-२०मध्ये ३ शतके झळकावली आहेत. विशेष बाब म्हणजे बाबर आझमने मोहम्मद युसूफला मागे टाकत पाकिस्तानसाठी वनडेमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तो आता सईद अन्वरच्या पुढे आहे, ज्याने पाकिस्तानसाठी २४७ एकदिवसीय सामन्यांमध्ये २० शतके झळकावली आहेत, तर बाबरने १०२ डावांमध्ये १९ शतके झळकावली आहेत.
पाकिस्तान: फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.
नेपाळ : कुशल भुर्तेल, आसिफ शेख (विकेटकीपर), रोहित पौडेल (कर्णधार), आरिफ शेख, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंग ऐरे, गुलशन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने, ललित राजवंशी.