Babar Azam To Dropped form Pakistan Squad: पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझम गेल्या काही काळापासून अत्यंत खराब फॉर्मातून जात आहे. त्याच्या कामगिरीत सातत्याने घसरण होत असून त्याची बॅट शांत आहे. तो संघासाठी सर्वात मोठी डोकेदुखी बनला असून संघ त्याच्या खराब फॉर्मची किंमत सामना गमावून चुकवत आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. पाकिस्तानच्या फलंदाजीतील महत्त्वाचा भाग असलेल्या बाबरची बॅट शांत असल्याने संघाला याचा फटका बसत आहे. यामुळे पाकिस्तान क्रिकेटने मोठा निर्णय घेत असल्याची चर्चा आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाबर त्याच्या कारकिर्दीतील वाईट टप्प्यातून जात आहे आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याला फार काळ क्रिजवर टिकता आले नाही. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना १५ ऑक्टोबरपासून मुलतानच्या मैदानावर खेळवला जाणार असून पीसीबीने अद्याप त्यासाठी संघ जाहीर केलेला नाही. EPSNcricinfo च्या वृत्तानुसार बाबर आझमला दुसऱ्या कसोटी सामन्यात प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – IND vs BAN: टीम इंडियाचा रेकॉर्डब्रेक सामना, एकामागून एक भारताने मोडले टी-२० मधील मोठे विक्रम, वाचा विक्रमांची यादी

बाबरला प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर करण्याचा निर्णय नव्याने स्थापन झालेल्या निवड समितीने शिफारस केल्याचे मानले जात आहे. अलीकडेच, आकिब जावेद, अझहर अली आणि अलीम दार हे नव्या निवड समितीमध्ये सामील झाले आहेत. पहिल्या कसोटीतील पराभवानंतर काही तासांतच लाहोरमध्ये समितीची बैठक झाली. यानंतर शनिवारी मुलतानमध्येही एक बैठक झाली, ज्यामध्ये पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी यांनीही हजेरी लावली.

हेही वाचा – IND W vs AUS W: भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरूद्ध किती धावांनी विजय आवश्यक? कसं आहे समीकरण

बाबरचे अखेरचे अर्धशतक डिसेंबर २०२२ मध्ये

बाबर आझमला डिसेंबर २०२२ पासून कसोटी क्रिकेटमध्ये एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याने ३० आणि ५ धावा केल्या आहेत. त्याच्या खराब कामगिरीनंतरही कर्णधार शान मसूदने त्याची बाजू घेत त्याला पाकिस्तानचा सर्वोत्तम फलंदाज म्हटले. प्रशिक्षक जेसन गिलेस्पीही बाबरला पाठिंबा देताना दिसले. ESPNcricinfo नुसार, शनिवारी झालेल्या बैठकीत बाबरला संघातून वगळण्याच्या बाजूने बहुतांश मते होती. खराब फॉर्ममध्ये झगडणारा बाबर पाकिस्तानातील स्पर्धा कायदे ए आझम ट्रॉफीसाठी उपलब्ध असेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

बाबर आझमने २०१६ मध्ये पाकिस्तानकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सध्या तो त्याच्या करिअरच्या वाईट टप्प्यातून जात आहे. आतापर्यंत त्याने पाकिस्तानसाठी ५५ कसोटी सामन्यांमध्ये ३९९७ धावा केल्या आहेत, ज्यात ९ शतकांचा समावेश आहे. बाबरने मर्यादित षटकांच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघ टी-२० विश्वचषक २०२४ आणि एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Babar azam set to be dropped from pakistan playing 11 for 2nd test against england pak vs eng bdg