Babar Azam T20 Century Record: पाकिस्तानचा कर्णधार आणि स्टार फलंदाज बाबर आझम सध्या लंका प्रीमियर लीग (LPL) २०२३ मध्ये खेळत आहे. तो लंका प्रीमिअर लीगमधील कोलंबो स्ट्रायकर्स फ्रँचायझीचा एक भाग आहे. बाबरच्या दमदार शतकाच्या जोरावर कोलंबोने सोमवारी गॅले टायटन्सविरुद्ध ७ गडी राखून रोमांचक विजय नोंदवला. कोलंबोला १८९ धावांचे लक्ष्य मिळाले. बाबरने ५९ चेंडूंचा सामना करत १०४ धावा केल्या. त्याने ८ चौकार आणि ५ षटकार मारले. बाबरचे हे १०वे टी२० शतक होते. हे शतक करत त्याने मोठा इतिहास रचला आहे. ‘युनिव्हर्स बॉस’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेलच्या एका खास क्लबमध्ये त्याने प्रवेश केला आहे. बाबरने तो पराक्रम गाजवला, जो अनुभवी विराट कोहलीही करू शकला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टी२० क्रिकेटमध्ये १० शतकांचा आकडा गाठणारा बाबर जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्याशिवाय केवळ वेस्ट इंडिजच्या गेलने हा पराक्रम केला आहे. ४३ वर्षीय गेलने टी२० क्रिकेटमध्ये एकूण २२ शतके झळकावली आहेत. कोहली, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅरॉन फिंच, डेव्हिड वॉर्नर आणि मायकेल क्लिंगर सर्वाधिक टी२० शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत. चौघांनीही आतापर्यंत अनुक्रमे ८-८ शतके केली आहेत. न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅककमल आणि इंग्लंडचा ल्यूक राइट यांनी प्रत्येकी सात शतके झळकावली आहेत. के.एल. राहुल, क्विंटन डी कॉक, रिली रोसो, जेसन रॉय, शेन वॉटसन, जोस बटलर आणि रोहित शर्मा प्रत्येकी सहा शतकांसह संयुक्त पाचव्या स्थानावर आहेत.

हेही वाचा: IPL 2024: सनरायझर्स हैदराबादमध्ये मोठा बदल; ब्रायन लाराची हकालपट्टी, ‘हा’ स्टार अष्टपैलू खेळाडू झाला मुख्य प्रशिक्षक

कोलंबो स्ट्रायकर्स आणि गॅले टायटन्स यांच्यातील सामन्याबद्दल बोलताना बाबरने पथुम निसांकासोबत पहिल्या विकेटसाठी १११ धावांची भागीदारी केली. तबरेझ शम्सीने १३व्या षटकात निसांकाला डॅनियलच्या हाती झेलबाद केले. त्याने ४० चेंडूत ५ चौकार आणि १ षटकारासह ५४ धावा केल्या. बाबरने नुवानिडू फर्नांडो (८) सोबत दुसऱ्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली. फर्नांडो १८व्या षटकात शम्सीचा बळी ठरला. रजिताने टाकलेल्या शेवटच्या षटकात कोलंबोला विजयासाठी १४ धावांची गरज होती आणि बाबरला पहिल्याच चेंडूवर शाकीब अल हसनने झेलबाद केले. अशा परिस्थितीत मोहम्मद नवाजने कोलंबोला रवाना केले. त्याने षटकाच्या दुसऱ्या-तिसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव घेतली आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवर षटकार आणि पाचव्या चेंडूवर चौकार लगावला.

लंका प्रीमियर लीगमधील पहिले शतक

बाबर आझमचे लंका प्रीमियर लीगमधील हे पहिले शतक होते. पदार्पणाच्या मोसमातील चौथ्या सामन्यात त्याने हा पराक्रम केला. एलपीएलमध्ये बाबर आझमची सुरुवात मध्यम होती कारण तो केवळ ७ धावा करून बाद झाला. पण त्याला लवकरच लय सापडली आणि पुढच्या दोन सामन्यात त्याने अनुक्रमे ५९ आणि ४१ धावा केल्या.

हेही वाचा: IND vs WI: काय म्हणता, टीम इंडियात एकमेव फॉर्मात असणाऱ्या तिलक वर्माच्या मागे रोहितच्या लेकीचे खास कनेक्शन? पाहा Video

माहितीसाठी की बाबर आझम टी२० क्रिकेटमध्ये १० शतके झळकावणारा पहिला आशियाई फलंदाज ठरला आहे. या यादीत भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली ८ शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

सर्वाधिक टी२० शतके

ख्रिस गेल – ४६३ सामन्यात २२ शतके

बाबर आझम – २६४ सामन्यात १० शतके

मायकेल क्लिंगर – २०६ सामन्यात ८ शतके

डेव्हिड वॉर्नर – ३५६ सामन्यात ८ शतके

विराट कोहली – ३७४ सामन्यात ८ शतके