Babar Azam Sets New T20 Cricket Record : पाकिस्तान सुपर लीगमध्ये पेशावार जाल्मीचं नेतृत्व करणाऱ्या बाबर आझमने बुधवारी रात्री मोठा कारनामा केला. बाबरने क्वेटा ग्लॅडिएटर्सच्या विरोधात ११५ धावांची खेळी केली. पाकिस्तान सुपर लीगमध्ये बाबर आझमचा हा पहिला शतक आहे. टी २० क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा कर्णधाराचं हे आठवं शतक आहे. या एका शतकामुळं बाबरने ऑस्ट्रेलियाचा धाकड फलंदाज डेविड वॉर्नर, एरॉन फिंचच्या एका विक्रमाची बरोबरी केली आहे. वॉर्नर, फिंचने टी-२० मध्ये ८-८ शतक ठोकले आहेत. पीएसलमध्ये केलेल्या शतकानंतर बाबरही या दोघांच्या बरोबरीत आला आहे. बाबर आझमच्या पीएसएलच्या धडाकेबाज खेळीचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे.

टी-२० मध्ये सर्वात जास्त शतक ठोकण्याचा विक्रम वेस्टइंडिजचा आक्रमक फलंदाज क्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने टी-२० मध्ये आतापर्यंत २२ शतक ठोकण्याची चमकदार कामगिरी केलीय. यानंतर बाबर आझम,एरॉन फिंच, डेविड वॉर्नर आणि मायकल क्लिंगर यांचं नावाची नोंद आहे. या चौघांचेही टी २० मध्ये ८-८ शतक आहेत आणि संयुक्तपणे ते दुसऱ्या स्थानावर आहेत. यानंतर ल्यूक राईट आणि ब्रॅंडन मॅकूलम (७-७) शतकांचा समावेश आहे.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
amitabh bachchan
विकी कौशलच्या वडिलांनी सांगितली अमिताभ बच्चन यांची आठवण; म्हणाले, “चिखलाने माखलेल्या अवस्थेत…”
snake viral video | snake bit video
बापरे! सापाने दंश करताच तरुणाने केलं असं काही की, VIDEO पाहून तुम्हालाही भरेल धडकी
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी

नक्की वाचा – गावस्कर-द्रविड यांचा विक्रम मोडण्याची ‘विराट’संधी; कोहलीला मैदानात पाडावा लागेल ‘इतक्या’ धावांचा पाऊस

इथे पाहा व्हिडीओ

विराट-रोहितचे ६-६ शतक

भारतीय फलंदाजांबाबत बोलायचं झालं, तर टी २० मध्ये सर्वात जास्त शतक ठोकणाऱ्या लिस्टमध्ये केएल राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली ६-६ शतकांमुळं संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहेत.

बाबरने पीएसएलमध्ये ठोकलं पहिलं शतक

क्वेटा ग्लॅडिएटर्स विरोधात झालेल्या सामन्यात पेशावर जाल्मीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली होती. बाबर आझम आणि सईम अयुबने पहिल्या विकेटसाठी १६२ धावांची भागिदारी केली. बाबरने १८ व्या षटकात नसीम शाहच्या षटकात चौकार ठोकून शतक पूर्ण केलं. बाबरने १७६ च्या स्ट्राईक रेटने ६५ चेंडूत ११५ धावा कुटल्या. या इनिंगमध्ये त्याने १५ चौके आणि ३ षटकार ठोकले. बाबरच्या शतकी खेळीच्या जोरावर पेशावर जाल्मीने २० षटकात २ विकेट गमावत २४० धावा केल्या. पण क्वेटा ग्लॅडिएटर्सने १८.२ षटकात २४३ धावा करून सामना जिंकला. जेसन रॉयने ४३ चेंडूत १४५ धावा केल्या.