Babar Azam’s Big Decision on Betting Company Logo Jersey: पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम नुकताच हज वरुन मायदेशी परतला आहे. तो त्याच्या आई आणि इतर साथीदारांसह हजला गेला होता. आता बातम्या येत आहेत की बाबर आझमने आगामी लंका प्रीमियर लीग (एलपीएल) दरम्यान सट्टेबाजी कंपनीचा लोगो असलेली जर्सी (ड्रेस) परिधान करण्यास नकार दिला आहे.

बाबर आझमच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, या पाकिस्तानी खेळाडूने यावर्षीच्या एलपीएल करारावर स्वाक्षरी करताना तो कोणत्याही सट्टेबाजी कंपनीत सामील होणार नाही, असे अट ठेवली आहे. सूत्राने सांगितले की, “बहुतेक पाकिस्तानी खेळाडू फ्रँचायझी मालकांना आणि लीग आयोजकांना सांगत आहेत की त्यांना कोणत्याही सट्टेबाजी कंपनीचा लोगो असलेली जर्सी घालायची नाही आणि त्यांचा प्रचार करायचा नाही.”

ajit pawar meets sharad pawar
पहिला मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार? अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
operation lotus
‘ऑपरेशन लोटस’वरून आरोप-प्रत्यारोप; चंद्रशेखर बावनकुळेंच्या दाव्याचे नाना पटोलेंकडून खंडन
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
Today is death anniversary of Nani Palkhiwala who secured fundamental rights in Kesavanand Bharti case
स्मरण एका महान विधिज्ञाचे…
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
kanhaiya kumar dissolved all branches of congress nsui unit in maharashtra
कन्हैयाकुमारकडून कारवाईचा बडगा, काँग्रेसच्या ‘या’ विभागाच्या सर्व शाखा बरखास्त
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

विशेष म्हणजे, विविध टी-२० लीग टूर्नामेंटमध्ये, अनेक ‘बेटिंग कंपन्या’ त्यांच्या नावात थोडासा बदल करून प्रायोजक बनतात. मात्र, बाबर यांनी कठोर भूमिका घेत जर्सीव त्यांचा लोगो किंवा जाहिरात लावण्यास नकार दिला आहे. क्रिकेट पाकिस्तान डॉट कॉमच्या वृत्तानुसार, पाकिस्तानी कर्णधाराने कोलंबो स्ट्रायकर्ससोबतच्या करारात ही अट समाविष्ट केली आहे. त्यामुळे फ्रेंचायझीला त्याच्या इच्छेचा आदर करण्यास भाग पाडले आहे.

हेही वाचा – ZIM Afro T10: झिम्बाब्वेमधील नव्या लीगला लवकरच होणार सुरुवात, पठाण ब्रदर्ससह ‘या’ भारतीय खेळाडूंचा असणार सहभाग

याआधी वरिष्ठ खेळाडू मोहम्मद रिझवानने पाकिस्तान सुपर लीगमध्ये सट्टेबाजी कंपनीचा लोगो असलेली जर्सी घालण्यास नकार दिला होता. काही पाकिस्तानी खेळाडूंनी बेटिंग कंपन्यांच्या जाहिरातींच्या विरोधात भूमिका घेतली आहे. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि त्यांच्या काही फ्रँचायझींना मागील हंगामात सट्टेबाजी करणाऱ्या कंपन्यांनी प्रायोजित केले होते आणि खेळाडूंनी त्यांच्या जर्सीवर अशा कंपन्यांचे लोगो लावले होते.

लंका प्रीमियर लीग ३० जुलै ते २२ ऑगस्ट दरम्यान होणार असून बाबर आझम या स्पर्धेत कोलंबो स्ट्रायकर्सकडून खेळणार आहे. एलपीएलमध्ये पहिला हंगाम खेळणाऱ्या बाबर आझम बरोबर कोलंबो स्ट्रायकर्स संघात वेगवान गोलंदाज नसीम शाह, श्रीलंकेच्या केमथिशा पाथिराना आणि चमिका करुणारत्ने यांचाही समावेश आहे. लंका प्रीमियर लीगपूर्वी, पाकिस्तान संघाला श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिकाही खेळायची आहे, जी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग आहे. पाकिस्तानचा संघ ९ जुलैला श्रीलंका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना

Story img Loader