Paris Olympics 2024: ८ ऑगस्ट हा दिवस पाकिस्तानच्या क्रीडा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल. तब्बल चार दशकांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर पाकिस्तानने या दिवशी ऑलिम्पिक पदक जिंकले. अर्शद नदीमने भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. त्यांच्या या ऐतिहासिक विजयानंतर सोशल मीडियावर त्यांचे अभिनंदनाच्या पोस्ट सर्वांनीच शेअर केल्या. यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या नावाचाही समावेश आहे.

हेही वाचा – Paris Olympic 2024 Live, Day 14: भारताची नजर सहाव्या ऑलिम्पिक पदकावर, अमन सेहरावतच्या कुस्ती सामन्याची प्रतिक्षा

Ranji Trophy 2024 Drying Pitch By Burning Cow Dung Cakes Desi Jugaad In Match Bihar vs Karnataka
Ranji Trophy : बिहार-कर्नाटक सामन्याची खेळपट्टी कोरडी करण्यासाठी चक्क ‘देसी जुगाड’, शेणाच्या गवऱ्या जाळतानाचा फोटो व्हायरल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
aarya jadhao called suraj chavan
आर्या जाधवचा फोन आल्यावर सूरज चव्हाण म्हणाला, “कोण पाहिजे?” रॅपरने माफी मागितली अन्…, पाहा Video
ulta chashma
उलटा चष्मा : ‘देवा’घरचा न्याय…
Cheteshwar Pujara broke Brian Lara's record for most first class centuries
Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजाराने मोडला ब्रायन लाराचा मोठा विक्रम, शतक झळकावत ठोकला टीम इंडियात पुनरागमनाचा दावा
Babar Azam was advised by Virender Sehwag
Babar Azam : ‘जेव्हा तुमचा खराब काळ चालू असतो, तेव्हा…’, वीरेंद्र सेहवागने बाबर आझमला दिला महत्त्वाचा सल्ला
CJI Dhananjay Chandrachud
“अयोध्येचा निकाल देण्यापूर्वी देवासमोर बसलो अन्…”, सरन्यायाधीश चंद्रचूडांनी सांगितला ‘तो’ किस्सा
nikki tamboli on suraj chavan won bigg boss sympathy card
सूरज चव्हाण सहानुभूतीमुळे बिग बॉस जिंकला, या टीकेवर निक्की तांबोळी म्हणाली, “मी ट्रॉफी उचलली असती तर…”

बाबरने अर्शदचे फोटो एक्सवर शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. पोस्टच्या कॅप्शनमध्ये बाबर आझमने लिहिले की, “३० वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये सुवर्णपदक परतले आहे. या महान कामगिरीबद्दल अर्शद नदीमचे खूप खूप अभिनंदन. तुम्ही संपूर्ण देशाला अभिमान बाळगण्याची संधी दिली आहे.” मात्र, या पोस्टमुळे पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार खूप ट्रोल होत आहे.

हेही वाचा – Arshad Nadeem New Olympic Record: पाकिस्तानच्या अर्शद नदीमचा ऑलिम्पिकमध्ये नवा रेकॉर्ड, तब्बल ९२.९७ मी लांब केला थ्रो

बाबर आझमने अर्शद नदीमला या पोस्टमध्ये टॅग केले आहे, पण त्याने चुकीच्या अर्शद नदीमला टॅग केलं आहे, त्यामुळे तो चांगलाच ट्रोल आहे. पाकिस्तानला ३० वर्षांनी सुवर्णपदक मिळाले आहे. पाकिस्तानने शेवटचे सुवर्णपदक १९९४ मध्ये जिंकले होते. चाहत्यांनी त्याला त्याची चूक लक्षात आणून दिली. बाबर आझमला पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या अपयशाची आठवण करून दिली आहे. एका यूजरने लिहिले, ‘तुम्हालाही देशाला अभिमान वाटावा, असं काम करण्याची संधी होती पण तुम्ही तसं करू शकला नाहीत’, असे लिहिले. तर दुसऱ्या एका लिहिले की ‘अर्शदने बाबरच्या स्ट्राइक रेटपर्यंत भाला फेकला आहे.

हेही वाचा – Neeraj Chopra: भालाफेकीच्या अंतिम फेरीत नीरज चोप्राकडून वारंवार फाऊल थ्रो का होत होता? स्पर्धेनंतर स्वत: सांगितले कारण

पाकिस्तानचा यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानने पोस्ट करत लिहिले, ‘असाधारण खेळाडूकडून सुवर्णपदक. यापेक्षा जास्त अभिमानाची गोष्ट असू शकत नाही. आंतरराष्ट्रीय मंचावर चमकदार कामगिरी कायम राहा. अष्टपैलू शादाब खाननेही अभिनंदन केले आणि लिहिले, ‘ऑलिम्पिकमधील कोणत्याही पाकिस्तानी खेळाडूची ही कदाचित सर्वात मोठी वैयक्तिक कामगिरी आहे. अर्शद नदीमच्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. तुम्ही ज्या प्रकारे देशाचे प्रतिनिधित्व केले त्याबद्दल धन्यवाद.