Babar Azam captaincy: पाकिस्तान क्रिकेट संघाचे नवे मुख्य निवडकर्ता इंझमाम-उल-हक याने बाबर आझमच्या कर्णधारपदावर मोठे विधान केले आहे. खरे तर, गेल्या वर्षी आशिया चषक आणि टी२० विश्वचषक स्पर्धेच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर बाबर आझमचे कर्णधारपद वादाच्या भोवऱ्यात आले होते आणि या स्टार क्रिकेटरकडून कोणत्याही फॉरमॅटमध्ये कर्णधारपद काढून घेतले जाऊ शकते, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, आता ऐन विश्वचषकाच्या तोंडावर अशा प्रकारची चर्चा सुरु झाल्याने याबाबत पाकिस्तान क्रिकेटमध्ये वेगवेगळी वक्तव्ये येत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि इंझमाम-उल-हक बाबर आझमला पाकिस्तानच्या कर्णधारपदावरून हटवण्याच्या सध्यातरी त्या मनस्थितीत नाहीत. पाकिस्तानच्या नवीन मुख्य निवडकर्त्याने कबूल केले आहे की, कोणत्या सामन्यासाठी कोणते खेळाडू निवडायचे हे जाणून घेण्यासाठी खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये एकच कर्णधार असावा.

बाबर आझम उत्तम कर्णधार करत आहे: इंझमाम-उल-हक

दरम्यान, हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, इंझमाम-उल-हक एका पत्रकार परिषदेत म्हणाला, “पहा, मला वाटते की संघाचा कर्णधार बदलणे हे आतातरी योग्य ठरणार नाही. मला वाटतं बाबर आझम उत्तम कर्णधार आहे आणि त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेण्यात काही अर्थ नाही. मी जेव्हा पहिला मुख्य निवडकर्ता होतो तेव्हा सरफराज अहमद खेळाच्या तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार नव्हता, पण नंतर त्याला तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद देण्यात आले होते.”

हेही वाचा: Asian Games: आईच्या अंत्यसंस्काराला न जाता देशासाठी थांबला, पण सरकारी गलथानपणामुळे रखडली आशियाई स्पर्धेची तयारी!

ते माझ्या अधिकारक्षेत्रात येत नाही: इंझमाम-उल-हक

इंझमाम-उल-हक पुढे म्हणाला की, “आता कर्णधार बदलणे योग्य वाटत नाही. खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकच कर्णधार असला पाहिजे. जर तो तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार असेल तर आपल्या खेळाडूंना कसे पुढे न्यावे, याची कल्पना त्याला येते. कोणत्या फॉरमॅटमध्ये कोणत्या खेळाडूंना संधी द्यायची आणि त्यातून सर्वोत्तम कामगिरी कशी मिळवायची हे देखील कळते. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की, कर्णधारपदाबाबत कोणताही निर्णय घेणे माझ्या अधिकारक्षेत्रात नाही.”

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया कप २०२३ साठी आपला संघ जाहीर केला आहे. पीसीबीने बाबर आझमच्या नेतृत्वाखाली १७ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. पीसीबीने आशिया चषक तसेच अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी समान संघाची घोषणा केली आहे. हाच संघ २ सप्टेंबर रोजी आशिया चषक स्पर्धेत भारतासमोर खेळणार आहे. वास्तविक, आशिया कप अंतर्गत फायनलसह एकूण १३ सामने होणार आहेत. यावेळी ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलच्या आधारे एकदिवसीय स्वरूपात खेळवली जाईल. यातील ४ सामने पाकिस्तानमध्ये होणार असून उर्वरित फायनलसह ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत.

हेही वाचा: Hardik Pandya: हार्दिक पांड्याच्या शॉटने चिमुरडी गंभीर जखमी, सामन्यानंतर कर्णधाराने दिली खास भेट; पाहा Video

आशिया कपसाठी पाकिस्तान संघ

अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तैब ताहिर, सौद शकील (फक्त अफगाणिस्तान मालिकेसाठी), मोहम्मद रिझवान, मोहम्मद हरिस, शादाब खान (उपकर्णधार), मोहम्मद नवाज, उस्मा मीर, फहीम अश्रफ, हारिस रौफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Babar azam will babar azam take the captaincy former player inzamam ul haq made a big revelation avw
Show comments