Babar Azam on Virat Kohli: पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने कसोटी क्रिकेटमध्ये विशेष कामगिरी केली आहे. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना किमान १५ डाव खेळल्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये त्याची फलंदाजीची सरासरी सर्वोत्तम आहे. या बाबतीत त्याने विराट कोहली आणि स्टीव्ह स्मिथसारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे. त्याचा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरपेक्षाही सरस आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये २० डाव खेळल्यानंतर बाबरची सरासरी ६९.१० आहे. यादरम्यान त्याने आठ अर्धशतके आणि चार शतके झळकावली आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ ३० डावात ५५.४०च्या सरासरीसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने सहा अर्धशतके आणि चार शतके झळकावली आहेत. इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट ३४ डावात ५४.२०च्या सरासरीने स्मिथच्या मागे आहे. रुटने क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये सहा अर्धशतकं आणि सहा शतकं झळकावली होती.

Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
India vs South Africa 2nd T20 Highlights in Marathi
IND vs SA 2nd T20I Highlights : रोमांचक सामन्यात यजमानांनी हिरावला भारताच्या तोंडचा घास, ट्रिस्टन स्टब्सच्या वादळी खेळीने फेरले वरुण चक्रवर्तीच्या मेहनतीवर पाणी
maharashtra vidhan sabha election 2024 Sanjay Puram vs Rajkumar Puram in Amgaon-Devari constituency
आमगाव-देवरीत संजय पुराम विरुद्ध राजकुमार पुराम सामना; माजी आमदारापुढे माजी सनदी अधिकाऱ्याचे आव्हान
aimim akbaruddin Owaisi marathi news
Akbaruddin Owaisi: “काँग्रेसमुळे मुस्लिमांवर ‘ही’ वेळ”, एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांचा काँग्रेसवर आरोप
India wicketkeeper batsman Sanju Samson expressed his feelings about the comeback sport news
अपयशानंतर स्वत:च्याच क्षमतेवर प्रश्न! कर्णधार, प्रशिक्षकांच्या पाठिंब्यामुळे बळ; विक्रमवीर सॅमसनची भावना

हेही वाचा: Rohit Sharma: रोहितला कर्णधार व्हायचेच नव्हते? WTCच्या पराभवानंतर चर्चेला उधाण, काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या

श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज अँजेलो मॅथ्यूज १६ डावात ४८.४०च्या सरासरीने चौथ्या क्रमांकावर आहे. मॅथ्यूजने मागील १६ डावांमध्ये दोन अर्धशतके आणि दोन शतके झळकावली आहेत. शेवटी, पाचव्या क्रमांकावर भारताचा महान फलंदाज विराट कोहली आहे, ज्याची २७ डावात ३४.६५ची फलंदाजी सरासरी आहे. यादरम्यान त्याने तीन अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे.

गेल्या महिन्यात पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज बाबर आझमने त्याच्या भविष्याविषयी सांगितले होते. पाकिस्तानचा कर्णधार म्हणून विश्वचषक जिंकण्याची इच्छा असल्याचे त्याने सांगितले. विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा कर्णधार बनणे चांगलेच असेल, असे त्याने आयसीसीच्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. विश्वचषकावर लक्ष केंद्रित करून, बाबर कोलंबो स्ट्रायकर्ससाठी लंका प्रीमियर लीगमध्ये देखील सहभागी होणार आहे.

हेही वाचा: Rohit Sharma: रोहितच्या कसोटी कर्णधारपदावर टांगती तलवार, वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर टीम इंडियाला मिळू शकते नवे नेतृत्व

कोलंबो स्ट्रायकर्सच्या प्रेस रिलीझनुसार, स्ट्रायकर्सने आधीच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह आणि श्रीलंकेच्या टी२० स्टार मथिशा पाथिराना आणि चमिका करुणारत्ने यांना लंका प्रीमियर लीग २०२३ साठी त्यांच्या संघात स्थान दिले आहे. “कोणत्याही फ्रँचायझी क्रिकेट स्पर्धेसाठी लिलाव हा सर्वात महत्वाचा पैलू असतो. आम्ही आम्हाला आवश्यक असलेल्या खेळाडूंबद्दल बोललो आहोत. तसेच, निश्चितपणे स्पर्धेतील सर्वात मजबूत संघ तयार करण्याचा प्रयत्न करू,” असे बाबर आझमने कोलंबो येथील पत्रकार परिषदेत म्हटले आहे.