आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर बबिता कुमारी, अमितकुमार दहिया व बजरंग यांची भारतीय कुस्ती महासंघाने यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर कुस्तीमध्ये कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या फोगट भगिनींपैकी बबिताने गतवर्षी ५५ किलो गटात अनेक स्पर्धामध्ये पदकांची लयलूट केली आहे. तिने ग्लासगो येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सोनेरी कामगिरी केली होती. अमितने २०१२ च्या ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत सहभागी झालेला तो भारताचा सर्वात तरुण मल्ल होता. त्याने २०१३ च्या जागतिक स्पर्धेत रौप्यपदक तर गतवर्षी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. बजरंग याने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. तसेच त्याने आशियाई व जागतिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा