सीएसए टी२० चॅलेंजच्या २५व्या सामन्यात टायटन्सचा फलंदाज डेवाल्ड ब्रेविसच्या तुफान खेळीने संपूर्ण मैदान गाजले किंवा त्याने गाजवले असे म्हणू शकतो. ब्रेव्हिसने विरोधी संघ नाइट्सच्या गोलंदाजांवर असा प्रहार केला की ते पाणी मागताना दिसले. ब्रेव्हिसच्या या अप्रतिम खेळीच्या जोरावर टायटन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ३ गडी गमावून २६८ धावा केल्या. एवढेच नाही तर त्याचा सहकारी सलामीवीर फलंदाज जीवनशान पिल्ले यानेही वेगवान अर्धशतक झळकावले आणि ४५ चेंडूत ५२ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियात टी२० विश्वचषक सुरू आहे, मात्र दक्षिण आफ्रिकेच्या युवा क्रिकेटपटूने त्याच्या उत्तम खेळीने ३१ ऑक्टोबरचा दिवस गाजवला. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा डेवाल्ड ब्रेव्हिस याने टी२० क्रिकेटमध्ये विक्रमी खेळी केली. त्याने ५७ चेंडूत १६२ धावा केल्या. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या स्थानिक टी२० क्रिकेटमधील टायटन्स संघाकडून खेळताना नाईट्स विरोधात ही विस्फोटक खेळी केली. यामध्ये त्याने १३ चौकार आणि १३ षटकार खेचले.

vasai municipal schools
“बजेट वाढवा पण शाळा सुरू करा”, स्नेहा दुबेंकडून पालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
Rohit Sharma Furious on Yashasvi Jaiswal Team Bus Leaves Without Him due to Indiscipline of India Opener
IND vs AUS: रोहित शर्मा यशस्वीवर वैतागला, जैस्वालला हॉटेलमध्येच सोडून गेली टीम बस; नेमकं काय घडलं?
Alzarri Joseph fined by ICC for abusing fourth umpire in WI-BAN ODI Month after two-match ban for on-field tiff
Alzarri Joseph: अल्झारी जोसेफला दोन सामन्यांच्या बंदीनंतर ICC ने ठोठावला दंड, पंचांना केली होती शिवीगाळ
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
IND vs AUS Srikkanth Blasts at Mohammed Siraj for Travis Head Send off Said Don't You Have brains
IND vs AUS: “सिराज वेडा आहेस का तू?…”, भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद सिराजवर संतापले, हेडच्या वादावर केलं मोठं वक्तव्य
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन

डेवाल्ड ब्रेव्हिस हा दक्षिण आफ्रिकेचा पुढचा एबी डिव्हिलियर्स मानला जातो आणि त्याला बेबी एबी म्हणूनही ओळखले जाते. या सामन्यात ब्रेविसने ज्या आक्रमक शैलीत डावाची सुरुवात केली त्याच पद्धतीने त्याचा शेवटही झाला. त्याच्या या खेळीदरम्यान तो गोलंदाजांना अजिबात सोडण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हता आणि त्याने सर्वांची जोरदार फटकेबाजी केली. पहिल्या विकेटसाठी ब्रेविसने जीवशानसह १७९ धावांची जबरदस्त शतकी भागीदारी केली. त्याचवेळी डोनावन फरेरानेही आपल्या संघासाठी १५ चेंडूत ३३ धावांची जलद खेळी केली. ब्रेव्हिसच्या झंझावाती खेळीमुळे प्रथम फलंदाजी करताना टायटन्सने ३ गडी गमावत २७१ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना नाईट्स संघ ९गड्यांच्या मोबदल्यात २३० धावांपर्यंत मजल मारू शकले.

हेही वाचा : T20 World Cup: ‘भारत वर्ल्डकप जिंकायला आला आणि…’ सामन्याआधी टीम इंडियाला दिले आव्हान

ब्रेव्हिसचे हे टी२०च्या कारकिर्दीतील पहिले शतक आहे. त्याने आतापर्यंतच्या ३२ सामन्यात ८०९ धावा केल्या आहेत. त्या ३२ सामन्यांतील ८०९ धावांत त्याने ५८ चौकार आणि ५७ षटकार मारले आहेत. तो अजूनही मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. त्याने ७ सामन्यात २३च्या सरासरीने १६१ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये १४ चौकार आणि ११ षटकारांचा समावेश आहे.

Story img Loader