बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात दरम्यान रिषभ पंतला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने स्लेजिंग करत एक चॅलेंज केले होते. ‘मी आणि माझी बायको बाहेर जेवायला किंवा सिनेमाला जाऊ तेव्हा तू आमची पोरं सांभाळशील का?’ असे चॅलेंज भारतीय यष्टीरक्षक रिषभ पंतला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने केले होते. पेनने दिलेले हे चॅलेंज पंतने पूर्ण केले आहे. आयसीसीने याबाबत ट्विटही केलं आहे.

एखाद्या विरोधी संघातील खेळाडूने दिलेले चॅलेंज पूर्ण केलेलं तूम्ही खूप कमी वेळा पाहिलं आहे. सोशल मीडियावर पंतवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतच्या खिलाडूवृत्तीची स्तुती केली जात आहे.

यष्टीरक्षक यष्टीमागून गोलंदाजांना मार्गदर्शन करताना अनेकवेळा तुम्ही पाहाता. कसोटीमध्ये फलंदाजाचा सयंम तोडण्याासाठी यष्टीरक्षक अनेकवेळा स्लेजिंग करतो. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान सुरू असेलेल्या कसोटी मालिकेत यष्टींमागून रिषभ पंत आणि टीम पेन प्रतिस्पर्धी संघाना स्लेजिंग तर स्वत:च्या संघाना सतत मार्गदर्शन करताना दिसत आहेत. ‘रिषभ पंत फलंदाजीला आल्यानंतर पेनने त्याला खिजविण्यात सुरवात केली. एकदिवसीय संघात आता धोनी परतला आहे. तू आता होबार्ट हरिकेन्सकडून खेळायला सुरवात कर. होबार्ट हे छान शहर आहे एकदा विचार कर,’ असा सल्ला पेनने पंतला तिसऱ्या कसोटीत दिला होता.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या चार कसोटी सामन्यात भारताने २-१ ने आघाडी घेतली आहे. चौथा कसोटी सामना सिडनी येथे होणार आहे.

Story img Loader