India vs Pakistan, Asia Cup 2023: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष नजम सेठी यांनी थेट आशियाई क्रिकेट परिषद आणि बीसीसीआयवर निशाणा साधला आहे. खराब हवामानामुळे सामन्यातील व्यत्ययाबाबत नजम म्हणाले की, “तो अंदाज आम्ही वर्तवला होता म्हणून सर्व सामने हे एकतर पाकिस्तान किंवा दुबईत व्हावे असे सांगितले होते. तरीही सामने श्रीलंकेत आयोजित केले.”

एसीसीला आशिया चषकाचे वेळापत्रक जाहीर करण्यास बराच वेळ लागला. पाकिस्तानला यजमानपदाचे पूर्ण अधिकार देण्याऐवजी श्रीलंकेत सामन्यांचे आयोजन करणे हे मुख्य कारण होते. बीसीसीआयने भारतीय संघाला पाकिस्तानात पाठवण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतरच ही स्पर्धा संकरित मॉडेलमध्ये घेण्यात आली. श्रीलंकेतील कॅंडी येथे शनिवारी खेळवण्यात आलेला भारत-पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द करावा लागला.

India Refuses Cricket In Pakistan
पाकिस्तानात चँपियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारताचा नकार का? पाकव्याप्त काश्मीरचा मुद्दा का चर्चेत?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात,’ मोदींनी नक्षलवाद व आतंकवाद संपविला’
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
Asaduddin Owaisi Bhiwandi Constituency, Waris Pathan,
मोदी हे भारतातील मशिदी उद्ध्वस्त करणारा कायदा आणणार, एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांची आरोप
Murbad , Kisan Kathore, Subhash Pawar,
मुरबाडच्या ‘कुणबी’ लढतीत आगरी अस्मिताही महत्वाची, लोकसभेनंतर ग्रामीण पट्ट्यात पुन्हा जातीय समिकरणांना वेग
maharashtra assembly election 2024 mim imtiaz ialil vs bjp atul save aurangabad east assembly constituency
लक्षवेधी लढत : एक है तो सेफ है’ विरोधात ‘इत्तेहाद’!
Afghanistan Batter Rahmanullah Gurbaj Surpasses Virat Kohli in Youngest to 8 Hundreds in Mens ODI Equals Sachin Tendulkar Record
AFG vs BAN: अफगाणिस्तानच्या फलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी, विराट कोहलीला मागे टाकलं तर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची केली बरोबरी

याबाबत पीसीबीचे माजी अध्यक्ष नजम सेठी म्हणाले, “हे खूपच निराशाजनक आहे. पावसाने क्रिकेटचा सर्वात मोठा सामना खराब केला. एसीसीचे अध्यक्ष जय शाह आणि बीसीसीआय यांनी फालतू कारण देत ही स्पर्धा श्रीलंकेत आयोजित केली. त्यावेळी मी पीसीबी चेअरमन असल्याने ‘एसीसी’ला यूएईमध्ये खेळण्याची विनंती केली होती, पण त्यांनी हा प्रस्ताव नाकारला. ‘त्यांनी नेहमीच काय यूएई’ असे म्हणत श्रीलंकेला सामावून घेण्याचे चुकीचे निमित्त केले.”

हेही वाचा: Gautam Gambhir: विराट स्वस्तात बाद झाल्याने गौतम गंभीर संतापला; म्हणाला, “हा काय शॉट आहे, तुमची दोस्ती-यारी…”

सेठी पुढे म्हणाले, “’दुबईत खूप गरम हवामान असते’, हे कारण सांगत एसीसीने प्रस्ताव नाकारला.” नजम सेठी पुढे म्हणाले, “जेव्हा सप्टेंबर २०२२ मध्ये आशिया चषक खेळला गेला तेव्हा हे वातावरण नव्हते का? एप्रिल २०१४ आणि सप्टेंबर २०२० मध्ये जेव्हा आयपीएल खेळला गेला तेव्हा इथले हवामान तितकेच गरम होते. त्यावेळी हे कारण आठवले नाही का? हे सर्व पीसीबीविरुद्ध कारस्थान केले गेले. बीसीसीआय, भारत सरकार आणि एसीसी यांनी खेळात राजकारण केले असून हे अक्षम्य आहे.”

उल्लेखनीय आहे की गेल्या वेळी आशिया चषक टी२० फॉरमॅटमध्ये खेळला गेला होता आणि त्याचे सर्व सामने रात्रीच्या वेळी यूएईमध्ये खेळले गेले होते. त्याच वेळी, आयपीएल फक्त टी२० फॉरमॅटमध्ये खेळले जाते. तर यावेळी आशिया चषक एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळवला जात आहे. कोविडमुळे, २०२० आणि २०२१ मधील आयपीएल सामने भारताबाहेर आयोजित करण्यात आले होते.

हेही वाचा: IND vs PAK: शाहीनचे कौतुक करताना पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांनी केला विराट-रोहितचा अपमान; म्हणाले, “तुम्ही त्याच्यासमोर…”

भारतासाठी सुपर-४ मध्ये पोहोचण्यासाठी काय समीकरणे आहेत:

भारताचा नेपाळविरुद्धचा सामना करो या मरो असा झाला आहे. नेपाळकडून जिंकल्यानंतर संघ सुपर-४ मध्ये जाईल. तो पराभूत झाल्यास नेपाळ पुढील फेरीत प्रवेश करेल. जर नेपाळविरुद्धचा सामनाही पावसामुळे रद्द झाला, तर भारताला एक गुण मिळेल आणि त्यामुळे त्याच्या एकूण गुणांची संख्या दोन होईल. अशा प्रकारे टीम इंडिया पुढील फेरीत पोहोचेल. पुढील फेरी गाठण्यासाठी नेपाळला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. त्याला मोठा अपसेट करावा लागेल. जरी सामना रद्द झाला तरी त्यांना फक्त एक गुण मिळेल आणि ते दोन सामन्यांत एकूण एक गुण घेऊन आशिया चषकातून बाहेर पडतील.