Ashes 2023 ENG vs AUS: एजबॅस्टन कसोटीत स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांच्या कामगिरीशिवाय ऑस्ट्रेलियाचा विजय हे इंग्लंडसाठी चिंतेचे कारण असल्याचे संजय माजरेकर यांनी म्हटले आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत लाबुशेन पहिल्या तर स्मिथ दुसऱ्या स्थानावर आहे. २०२३च्या अ‍ॅशेसच्या पहिल्या सामन्यात दोघांची बॅट शांत राहिली. लाबुशेनने (०) आणि (१३) धावा केल्या दुसरीकडे स्मिथने १६ आणि ६ धावा केल्या. हे दोन्ही फलंदाज ऑस्ट्रेलियासाठी ५० धावाही करू शकले नाहीत. अशा परिस्थितीत आगामी सामन्यांसाठी इंग्लंडला या दोघांसाठी सज्ज राहावे लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय मांजरेकर यांनी सांगितले इंग्लंडसाठी धोक्याची घंटा आहे स्मिथ आणि लाबुशेन

ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर संजय मांजरेकर यांनी ट्वीट केले की, “स्मिथ आणि लाबुशेन यांच्या योगदानाशिवाय ऑस्ट्रेलियाने जिंकणे हे इंग्लंडसाठी थोडे अपशकुन आहे. हे दोन्ही फलंदाज त्यांचा चांगला दिवस असताना ऑस्ट्रेलियाला सामने एकहाती जिंकून देऊ शकतात.” त्यामुळे मांजरेकर यांनी इंग्लंडचा हा पराभव मोठा असल्याचे वर्णन केले आहे.

अ‍ॅशेस २०२३ च्या पहिल्या कसोटीनंतर माजी क्रिकेटपटू सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देण्यात व्यस्त आहेत. यादरम्यान भारतीय क्रिकेटपटूंनीही ट्वीट केले. वसीम जाफरने इंग्लंडच्या ‘बझबॉल’ शैलीची खिल्ली उडवली, दुसरीकडे वीरेंद्र सेहवागने इंग्लंडचा निर्णय धाडसी असल्याचे वर्णन केले. यादरम्यान सेहवागने ऑस्ट्रेलियन संघाचे कौतुकही केले. एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ दोन विकेट्सने विजय मिळवण्यात यशस्वी ठरला. यजमान इंग्लंडने कांगारूंसमोर विजयासाठी २८१ धावांचे लक्ष्य ठेवले होते, ही धावसंख्या उस्मान ख्वाजा आणि पॅट कमिन्स यांच्या लढाऊ खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने गाठून ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

हेही वाचा: MS Dhoni: “आम्हा सर्वांना त्याच्यातील हे कौशल्य…” एम.एस. धोनी कर्णधार कसा झाला? याबाबत दिलीप वेंगसरकरांनी केला खुलासा

वीरेंद्र सेहवागने इंग्लंडच्या धाडसाचे केले कौतुक

ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर वीरेंद्र सेहवागने ट्वीट केले, “काय कसोटी सामना आहे, मी अलीकडच्या काळात पाहिलेल्या सर्वोत्तमांपैकी एक. कसोटी क्रिकेट हे सर्वोत्तम क्रिकेट आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी घोषित करण्याचा इंग्लंडचा निर्णय धाडसाचा होता, विशेषतः हवामानाचा विचार करता. पण ख्वाजा दोन्ही डावात उत्कृष्ट खेळला. पॅट कमिन्स हा कसोटी क्रिकेटमधील नवा मिस्टर कूल आहे. दडपणाखालील खेळी आणि लायनसोबतची ती भागीदारी दीर्घकाळ स्मरणात राहणारी आहे.”

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने आपला पहिला डाव ३९३ धावांवर घोषित केला होता. कर्णधार बेन स्टोक्सच्या या निर्णयावर क्रिकेटपंडितांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वास्तविक, जो रूट शतक झळकावल्यानंतर क्रीजवर उपस्थित होता आणि इंग्लिश संघाला आपल्या धावांमध्ये आणखी भर घालण्याची उत्तम संधी होती. पण आपल्या निष्कलंक कर्णधारपदासाठी प्रसिद्ध असलेल्या बेन स्टोक्सने ऑस्ट्रेलियावर दडपण आणण्यासाठी हा धाडसी निर्णय घेतला. दुसरीकडे, वसीम जाफरबद्दल बोलायचे झाले तर त्याने इंग्लंडच्या बझबॉलला त्याच्याच शैलीत ट्रोल केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bad performances smith and labuschagne but australia wins these are not good signs for england said sanjay manjrekar avw