भारताचे आशास्थान असलेल्या पी. व्ही. सिंधूने मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे आणि विजेतेपदची हॅट्ट्रिक साधण्याच्या आशा कायम ठेवल्या आहेत. सिंधूने चुरशीच्या लढतीत चीनच्या चेन येफुईवर २१-१३, १८-२१, २१-१४ असा रोमहर्षक विजय मिळवला. या स्पर्धेत आव्हान राहिलेली ती एकमेव भारतीय खेळाडू आहे. १५व्या मानांकित साईप्रणीतला सव्वा तासाच्या लढतीनंतर गोहसुआन हुआतकडून १६-२१, २३-२१, १३-२१ असा पराभव स्वीकारावा लागला. उत्कंठापूर्ण लढतीत त्याने दुसरा गेम घेतल्यानंतर खेळावरील नियंत्रण गमावले. सातव्या मानांकित प्रणॉयला इंडोनेशियाच्या एहसान मौलाना मुस्तफाने १८-२१, २१-१९, २१-११ असे हरवले.

Story img Loader