युवा बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने मकाऊ ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत आगेकूच केली. स्पर्धेत भारताचे एकमेव प्रतिनिधी राहिलेल्या अव्वल मानांकित सिंधूने पाचव्या मानांकित हाँगकाँगच्या त्स्झ का चेनवर २१-१७, २१-१२ असा सरळ गेम्समध्ये विजय मिळवला. पहिल्या गेममध्ये दोघींमध्ये चुरशीचा मुकाबला रंगला. १७-१७ अशा बरोबरीच्या स्थितीतून सिंधूने सलग चार गुणांची कमाई करीत पहिला गेम नावावर केला. दुसऱ्या गेममध्ये चेनने आघाडी घेतली होती, मात्र सिंधूने ३-३ अशी बरोबरी केली. त्यानंतर सातत्याने आघाडी वाढवत सिंधूने दुसऱ्या गेमसह सामन्यावर कब्जा केला. दुसऱ्या गेममध्ये जोरदार रॅली, स्मॅशेस आणि नेटजवळचा अचूक खेळ सिंधूच्या खेळाचे वैशिष्टय़ ठरले.
बॅडमिंटन : सिंधू उपांत्य फेरीत
युवा बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने मकाऊ ग्रां.प्रि. बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत आगेकूच केली. स्पर्धेत भारताचे एकमेव प्रतिनिधी राहिलेल्या अव्वल मानांकित
First published on: 30-11-2013 at 12:57 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badminton sindhu to play in semifinals of macau gp prix badminton cup