इंडियन बॅडमिंटन लीगच्या (आयबीएल) खेळाडूंच्या लिलावानंतर बॅडिमटन या खेळाची पाळेमुळे देशभरात घट्ट रोवल्याचे समोर आले आहे. आयबीएलमुळे हा खेळ देशात लोकप्रिय होण्यास मदत होईल, असे भारतीय बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अखिलेश दास गुप्ता यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘खेळाडूंच्या लिलावात संघमालकांनी बरीचशी रक्कम भारतीय खेळाडूंवर खर्च केली आहे. ही भारतीय खेळाडू आणि खेळासाठी चांगली बाब म्हणावी लागेल. प्रत्येक संघ समतोल असल्यामुळे जेतेपदासाठी सहा संघांमध्ये चुरस रंगणार आहे. या लीगमुळे भारतीय खेळाडूंनाही चांगले दिवस येणार आहेत.’’ भारताचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी आयबीएलच्या संकल्पनेचे कौतुक केले. ‘‘आयबीएलद्वारे खेळाडूंनाही चांगले पैसे मिळणार आहेत. त्यामुळे आपली कामगिरी सुधारण्यासाठी त्याचा फायदा खेळाडूंना होणार आहे,’’ असे गोपीचंद यांनी सांगितले.
‘आयबीएल’मुळे बॅडमिंटन खेळ देशात लोकप्रिय होईल -अखिलेश
इंडियन बॅडमिंटन लीगच्या (आयबीएल) खेळाडूंच्या लिलावानंतर बॅडिमटन या खेळाची पाळेमुळे देशभरात घट्ट रोवल्याचे समोर आले आहे. आयबीएलमुळे हा खेळ देशात लोकप्रिय होण्यास मदत होईल, असे भारतीय बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अखिलेश दास गुप्ता यांनी सांगितले.
First published on: 23-07-2013 at 06:13 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Badminton sports will popular due to indian badminton league akhilesh