पीटीआय, कोपेनहेगन : भारताच्या एच.एस. प्रणॉयने जबरदस्त झुंज देत डेन्मार्कचा अव्वल मानांकित व्हिक्टर अ‍ॅक्सेलसेनवर तीन गेममध्ये १३-२१, २१-१५, २१-१६ असा विजय मिळवून जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताच्या द्वितीय मानांकित सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी जोडीचे आव्हान मात्र संपुष्टात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रणॉयने शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत कमालीचा संयम बाळगताना अ‍ॅक्सेलसेनचे आव्हान १ तास ८ मिनिटांच्या लढतीनंतर संपुष्टात आणले. व्हिक्टरने पहिल्या गेमला निर्विवाद वर्चस्व राखताना २-२ अशा बरोबरीनंतर ९-२ अशी आघाडी १६-१३ अशी वाढवली. या स्थितित सलग पाच गुण मिळवत अ‍ॅक्सेलसेनने पहिला गेम जिंकला.

दुसऱ्या गेमला कमालीचा चुरस सुरुवातीपासून दिसून आली. रॅलीजच्या बहारदार खेळाने ही गेम ८-८ अशी बरोबरीत होती. तेव्हा प्रणॉयने सलग पाच गुणांची कमाई करताना १३-१० अशी आघाडी घेतली आणि ती १७-१० अशी वाढवत दुसरा गेम सहज जिंकला. तिसऱ्या निर्णायक गेमला आणखी चुरस अपेक्षित होती. पण, प्रणॉयने ४-४ अशा बरोबरीनंतर ७-६ अशी आघाडी सलग पाच गुण मिळवत १२-६ अशी वाढवली आणि कधीच मागे वळून बघितले नाही. प्रणॉयने २०-१५ अशा आघाडीवर मिळविलेल्या सहा मॅचपॉइंटपैकी एक गमावला. मात्र, पुढच्याच गुणाला प्रणॉयने विजयावर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, दुहेरीत भारताच्या दुसऱ्या मानांकित सात्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी जोडीची जागतिक स्पर्धेतील वाटलाच उपांत्यपूर्व फेरीत खंडित झाली. डेन्मार्कच्या किम अस्ट्रप-आंद्रेस स्कार्प रॅस्मुसेन जोडीने भारतीय जोडीचा २१-१८, २१-१९ असा पराभव केला. डेन्मार्क जोडीला ११वे मानांकन होते. ही लढत ४८ मिनिटे चालली. डेन्मार्कच्या जोडीसमोर भारतीय जोडी आपली आक्रमकता दाखवू शकली नाही. भारतीय जोडीने गेल्या स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते.