कोलॅरडो स्प्रिंग्स, अमेरिका येथे होणाऱ्या डेव्ह शुल्टझ स्मृती आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जाण्याचा कुस्तीपटू बजरंगचा मार्ग मोकळा झाला आहे. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता आणि बजरंगचा भाऊ योगेश्वर दत्तने याप्रकरणी पुढाकार घेत भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साइ) अधिकाऱ्यांना परिस्थिती समजावून सांगितली. योगेश्वरच्या प्रयत्नांनंतर ‘साइ’ने बजरंगला या स्पर्धेसाठी निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला.
ेस्पर्धेसाठी रवाना होण्याच्या तासभर आधी बजरंगला अमेरिकेला जाता येणार नसल्याचे कळले. त्यानंतर योगेश्वर दत्तने ‘साइ’चे महासंचालक जिजी थॉमसन आणि ‘साइ’चे सांघिक विभागीय प्रमुख राजिंदर सिंग यांची भेट घेतली. डेव्ह शुल्टझ या पंधरा दिवसांच्या प्रशिक्षण आणि स्पर्धा कार्यक्रमासाठी बजरंगच्या प्रवासाचा, निवासाचा, खाण्यापिण्याचा खर्च करावा अशी विनंती योगेश्वरने केली. चर्चेच्या या बैठकीनंतर थॉमसन यांनी बजरंगला या दौऱ्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना थॉमसन यांनी संबंधितांना दिल्या. आता २१ जानेवारीला बजरंग अमेरिकेसाठी रवाना होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा