भारतीय कुस्तीपटूने जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत दमदार पुनरागमन करत ६५ किलो वजनी गटात कांस्यपदकाची कमाई केली आहे. कझाकस्तान येथे सुरु असलेल्या स्पर्धेत बजरंगने मंगोलियाच्या तुलगा तुमुर ओचीरवर ८-७ ने मात केली. महत्वाची गोष्ट म्हणजे या सामन्यात बजरंग सुरुवातीला ०-६ अशा पिछाडीवर होता, यानंतर बजरंगने आपला सर्व अनुभव पणाला लावत कांस्यपदक आपल्या नावे केलं.

जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासातलं बजरंगचं हे तिसरं पदक ठरलं आहे. २०१३ साली बजरंगने कांस्यपदकाची कमाई केली होती, तर याच स्पर्धेत गतवर्षी बजरंग रौप्यपदकाचा मानकरी ठरला होता. जागतिक स्पर्धेत ३ पदकांची कमाई करणारा बजरंग पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे. बजरंगने याआधी २०२० टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं आहे.

Story img Loader