टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणारे बजरंग पुनिया आणि रवी दहिया यांनी आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठीच्या निवड चाचणीमध्ये आपापले सामने गमावल्याने पॅरिस ऑलिम्पिक पात्रतेच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. बजरंग पुनिया हा माजी WFI अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधातील एक प्रमुख चेहरा होता. त्याला पुरुषांच्या फ्रीस्टाइल ६५ किलो गटाच्या उपांत्य फेरीत रोहित कुमारकडून १-९ असा पराभव पत्करावा लागला. याआधी त्याला रविंदरविरुद्ध मोठ्या प्रयत्नांनंतर विजय मिळवता आला. सामन्यात इशारा मिळाल्याने रविंदरने गुण गमावला नसता, तर पुनिया पहिल्याच सामन्यात बाद झाला असता.

बजरंग पुनियाने रागाच्या भरात भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) केंद्र सोडले. चाचणीच्या तयारीसाठी पुनियाने रशियात प्रशिक्षण घेतले होते. पुनियाने दिल्ली उच्च न्यायालयात दावा जिंकला की निलंबित कुस्ती महासंघाला (WFI) चाचणी घेण्याचा अधिकार नाही.

novak djokovic breaks roger federer record
ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा : जोकोविचचे ऐतिहासिक यश ; फेडररला मागे टाकत सर्वाधिक ग्रँडस्लॅम सामन्यांत सहभाग
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Senior advocate Iqbal Chagla passes away
अन्वयार्थ : गोड बोलण्यापेक्षा, न्यायाचे बोला!
ajith kumar team won dubai car race 2
सरावादरम्यान क्रॅश झाली होती कार, तरीही जिंकली दुबईतील स्पर्धा; ‘या’ दाक्षिणात्य सुपरस्टारवर कौतुकाचा होतोय वर्षाव
Sabalenka Zverev progress
सबालेन्का, झ्वेरेवची विजयी सलामी
Dr Kartik Karkera from Mumbai
मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा नाशिक मविप्र मॅरेथॉन -२०२५ चा विजेता, पहिले तीनही धावपटू महाराष्ट्रातील
Devdutt Padikkal smashes hundred in quarterfinal against Baroda in Vijay Hazare Trophy 2025
Vijay Hazare Trophy : १५ चौकार अन् २ षटकार… देवदत्त पडिक्कलची शतकी खेळी बडोद्यावर पडली भारी
Tirupati Stampede Latest Updates| Stampede at Tirupati bairagipatteda token counter
Tirupati Stampede : तिरुपतीच्या चेंगराचेंगरीत कायमची ताटातूट, व्हायरल व्हिडिओमुळे पतीला समजली पत्नीच्या मृत्यूची बातमी

टोकियो रौप्यपदक विजेता रवी दहिया आणि स्टार-इन-द-मेकिंग अमन सेहरावत हे दोघेही स्पर्धक असल्याने पुरुषांच्या ५७ किलो वजनी गट नेहमीच आव्हानात्मक राहिला आहे. दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या दहियाला सलामीच्या लढतीत अमनकडून १३-१४ असा पराभव पत्करावा लागला. दोघेही छत्रसाल स्टेडियममध्ये प्रशिक्षण घेतात. अमनने २०२३ मध्ये जवळपास सर्वच स्पर्धांमध्ये पदके जिंकून आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. या चाचण्या भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) च्या तदर्थ पॅनेलद्वारे आयोजित केल्या आहेत.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या अमनने शेवटच्या क्षणी दहियाचे दडपण मोडून काढत निकराचा लढा देत सामना जिंकला. दहिया पुढील चढाईत अंडर-२० आशियाई चॅम्पियन उदितकडून पराभूत झाला आणि तो बाहेर पडला. चाचण्यांमधील विजेत्यांना आशियाई आणि जागतिक ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळेल. अंतिम पंघलच्या (महिला ५३ किलो)रूपात भारताने पॅरिस गेम्ससाठी आतापर्यंत फक्त एक कोटा मिळवला आहे.

Story img Loader