Bajrang Punia threatened to quit Congress : भारताचा स्टार कुस्तीपटू आणि नुकताच काँग्रेसमध्ये सामील झालेल्या बजरंग पुनियाला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. कुस्तीपटूने सांगितले की, त्याला विदेशी नंबरवरून ही धमकी मिळाली होती. त्यात लिहिले आहे की, ‘बजरंग काँग्रेस सोड अन्यथा तुझी आणि तुझ्या कुटुंबाची खैर नाही. हा आमचा शेवटचा मेसेज आहे. निवडणुकीपूर्वी आम्ही काय आहोत ते दाखवून देऊ. तुला कुठेही तक्रार करायची असेल करं, हा आमचा पहिला आणि शेवटचा इशारा आहे.’ यानंतर बजरंगच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी या प्रकरणाचा सुरू केला तपास –

याप्रकरणी पोलिस प्रवक्ते रवींद्र सिंह म्हणाले, बजरंग पुनियाने सोनीपतमधील बहलगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्याला बाहेरच्या नंबरवरून मेसेज आला आहे. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांची कारवाई सुरू आहे. अज्ञात व्यक्तीने धमकी दिली आहे. हा तपासाचा विषय आहे. त्याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आणि त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. याशिवाय धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत.

बजरंगला विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळाले नाही –

बजरंग आणि विनेश फोगट यांनी अलीकडेच काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेसने बजरंग पुनियाला विधानसभेचे तिकीट दिले नाही, तर हरियाणा विधानसभेच्या जुलाना मतदारसंघातून विनेश फोगटला उमेदवारी दिली आहे. बजरंगला तिकीट न मिळाल्याबद्दल प्रश्न विचारला असता, तो म्हणाला की निवडणूक लढवणे म्हणजे राजकारण नाही. याआधीही दोघांपैकी एकजण निवडणूक लढवणार असल्याचे बोलले होते. विनेश फोगट लढत आहे आणि मी तिला पाठिंबा देत आहे.

हेही वाचा – Paralympics 2024: ७ सुवर्ण, एकूण २९ पदकांसह पॅराखेळाडूंची पॅरिस मोहीम फत्ते

बजरंग पुनिया काँग्रेस किसान मोर्चाचा कार्याध्यक्ष –

काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षाने बजरंग पुनियाला काँग्रेस किसान मोर्चाचा कार्याध्यक्ष बनवले आहे. देशातील सर्वात जुन्या पक्षात सामील होण्यापूर्वी त्याने रेल्वेतील नोकरीचा राजीनामा दिला होता. काँग्रेसमध्ये प्रवेश करताच बजरंगने सत्ताधारी पक्ष भाजपवर तोफ डागली होता. आम्ही काँग्रेस आणि देश मजबूत करू. कुस्तीपटूच्या संघर्षात भाजप आमच्या पाठीशी उभा राहिला नव्हता. आता आमच्यावर काँग्रेसमध्ये गेल्याची टीका होत आहे, असे बजरंग पुनिया म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bajrang punia received life death threats message from foreign number on whatsapp says leave congress otherwise vbm