Bajrang Punia stands on poster with Indian flag video viral :: भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया वादात सापडला आहे. वास्तविक, बजरंग पुनियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बजरंग पुनिया तिरंग्यावर उभा असलेला दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधून परतलेली कुस्तीपटू विनेश फोगटच्या स्वागतासाठी बजरंग पुनिया गेला होता, मात्र आता हा कुस्तीपटू वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

सोशल मीडियावर यूजर्सनी व्यक्त केला संताप –

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये बजरंग पुनिया तिरंग्यावर उभा असलेला दिसत आहे. ज्यामुळे चाहते सतत कमेंट करुन बजरंग पुनियावर संताप व्यक्त करत आहेत. या कुस्तीपटूने भारताच्या तिरंग्याचा अपमान केल्याचे लोकांचे म्हणणे आहे. फोटोंशिवाय सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. शनिवारी भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमधून परतली. बजरंग पुनिया, साक्षी मलिक असे अनेक प्रसिद्ध चेहरे तिच्या स्वागतासाठी विमानतळावर पोहोचले होते.

Shocking video of elder man kissing young woman on stage while dancing obscene video viral on social media
तरुणीला पाहून आजोबांचा सुटला ताबा, भरस्टेजवर डान्स सुरू असतानाच केलं किस अन्…, VIDEOमध्ये पाहा पुढे काय काय घडलं
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO
father son emotional video
“जेव्हा प्रेम आणि कर्तव्य दोन्ही समोर असतात”, मुंबईतील रेल्वेस्थानकावरील ‘हा’ VIDEO पाहून कळेल बापाची माया काय असते
Brother sister emotional video bride remembered his father at the wedding and crying emotional video goes viral
VIDEO:”जेव्हा वडिलांची जागा भाऊ घेतो” अंगाला हळद लागली पण बघायला बाप नाही, वडिलांचा फोटो घेऊन भावानं काय केलं पाहा
pushpa in Kolhapur
कोल्हापुरच्या रस्त्यावर फिरतोय पुष्पा! चिमुकले घाबरले तर मोठ्यांनी काढली सेल्फी, पाहा VIRAL VIDEO

क्रीडा लवादाच्या न्यायालयाने याचिका फेटाळली –

विशेष म्हणजे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठूनही विनेश फोगट पदक जिंकण्यापासून वंचित राहिली. वास्तविक, विनेश फोगटने ५० किलो वजनी गटात भाग घेतला होता. पण अंतिम फेरीपूर्वी या कुस्तीपटूचे वजन केवळ १०० ग्रॅम जास्त होते, त्यानंतर ती अपात्र ठरली. अशाप्रकारे अंतिम फेरी गाठूनही विनेश फोगट पदक जिंकण्यात अपयशी ठरली. मात्र, त्यानंतर विनेश फोगटने क्रीडा लवादाच्या न्यायालयात दाद मागितली, पण ती फेटाळण्यात आली.

हेही वाचा – Virat Kohli : धोनी की डिव्हिलियर्स, विराटचा आवडता क्रिकेटर कोण? किंग कोहलीच्या रॅपिड फायरचा VIDEO व्हायरल

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतून पदकाशिवाय परतलेल्या कुस्तीपटू विनेश फोगटचे स्वागत एखाद्या पदक विजेत्या खेळाडूंचेही झाले नसेल, अशा प्रकारे दिल्ली विमानतळावर करण्यात आले. यानंतर गावी पोहोचल्यानंतर विनेश फोगटने काका महावीर यांची भेट घेतली. यावेळी दोघेही खूप भावूक दिसत होते. विनेशने सांगितले की, ऑलिम्पिकमध्ये पदक न मिळाल्याने तिला खूप दुख झाले आहे. ही जखम बरी व्हायला वेळ लागेल. याशिवाय ती म्हणाली की भारतीय कुस्ती महासंघ (डब्ल्यूएफआय) विरुद्धचा आपला लढा संपलेला नाही. हा लढा दीर्घकाळ चालणार आहे.

Story img Loader